Australia vs Pakistan Champions WCL 2025 funny moment वर्ल्ड चॅम्पियन्स लीग २०२५ (WCL2025) सामन्यात आगळावेगळा पण नकोसा विक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्धच्या लढतीतील हा प्रसंग आहे. पाकिस्तानने हा सामना १० विकेट्स राखून जिंकला असला तरी या सामन्यात एका षटकाची जोरदार चर्चा रंगली. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा जलदगती गोलंदाज जॉन हॅस्टिंग्सने ( John Hastings) १८ चेंडूंच षटक टाकलं आणि तेही त पूर्ण करू शकला नाही. कारण सामनाच पाकिस्तानने जिंकला.
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सकडून आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या जॉनने अशी गोलंदाजी केली, की हसावं की रडावं हेच संघाला कळत नव्हते. त्याने त्याच्या षटकात तब्बल १२ वाईड आणि १ नो बॉल फेटका. या १३ अतिरिक्त धावांसह त्याने २० धावा दिल्या.
IND vs ENG 5th Test: जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर; त्याची रिप्लेसमेंटही ठरली, BCCI च्या वैद्यकीय टीमने घेतला निर्णय, कारण...पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार शोएब मलिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ७४ धावांत तंबूत परतला. ऑसींचा डाव ११.५ षटकांत गडगडला. पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याने ६ विकेट्स घेतल्या, तर इमाद वसमीने २ बळी टिपले. कांगारूंकडून बेन डंकने सर्वाधिक २६ धावा केल्या.
सईद अजमलने ३.५ षटकांच्या स्पेलमध्ये १६ धावा देत ६ बळी घेतले. त्याने डार्सी शॉर्ट, बेन डंक, डॅन ख्रिश्चन, बेन कटिंग, पीटर सिडल आणि स्टीव्ह ओ'कीफ यांना बाद केले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने ७.५ षटकांत सामना जिंकला. शरदील खानने २३ चेंडूंत ३२ धावा केल्या, तर शोएब मकसूदने २६ चेंडूंत २८ धावांची नाबाद खेळी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी षटकं
स्कॉट बॉसवेल - १४ चेंडू
डॅरिल टफी - १४ चेंडू
कर्टी अॅम्ब्रोस - १५ चेंडू
मोहम्मद सामी - १७ चेंडू
बर्ट व्हान्स - २२ चेंडू