“त्या माऊलीची काय चूक आहे?. 21 ऑक्टोंबर 2023 रोजी महादेव मुंडेंची हत्या झाली. अद्याप आरोपी सापडलेले नाहीत, म्हणून आता विष पिऊन झालं. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना भेटीची वेळ दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाण मांडल्यानंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे” असं बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले. आकाची टोळी सक्रीय आहे, आका जेलमधून कारभार हाकतो या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले की, “मी यावर बऱ्याचवेळा बोललो आहे. यामुळे आता बोलायचं नाही. जेलमध्ये एक स्पेशल फोन सुद्धा सापडला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. तो छोटा फोन जो आका वापरत होते, त्याचे डिटेल्स घेतलेत, तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील” असा दावा धस यांनी केला.
“महादेव मुंडे प्रकरण मी बाहेर काढलं. आधी कोणी त्यावर बोलत नव्हतं. सर्वात आधी मी त्यावर बोललो” असा दावा सुरेश धस यांनी केला. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेत. कृषी घोटाळ्यात त्यांना दिलासा मिळालाय. त्यावर सुरेश धस म्हणाले की, “या बाबतीत मी बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. प्रकाश दादा बोलले आहेत. मला बोलायचं नाही. क्लीन चीट मिळाली असली, तरी काही लोक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत”
एक घोटाळा नाही
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय. पोलिसांवर गन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्या विषयीच्या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले की, “एवढ्या मोठ्या केसबद्दल माझ्या सारख्या छोट्या माणसाने बोलणं योग्य नाही” कृषी अधिकारी रस्तोगींना तुम्ही पत्र दिलेलं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “एखाद्या घोटाळ्यात क्लीनचीट मिळाली असेल. एक घोटाळा नाही. मधल्या कालावधीत एवढी मोठी प्रकरणं आहेत. डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले. 78 कंपन्या स्थापन केल्या. या सगळ्याची स्वतंत्र एसआयटी स्थापन करुन चौकशी व्हावी” अशी मागणी सुरेश धस यांनी केली. जे चौकशी अधिकारी नेमले त्यांच्यावर मी आक्षेप घेतला होता असं सुरेश धस म्हणाले.
खाली आका बैठका घेत होते
वाल्मिक कराड या घोटाळ्यात आहे का? “100 टक्के त्यांच्याच कालवधीतली ही सगळी प्रकरण आहेत. हे स्वत: किती कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय आहे. खाली आका बैठका घेत होते” असं सुरेश धस म्हणाले.