फक्त भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना कोण ओळखत नाही ? मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच नीता अंबानी देखील नेहमीच चर्चेत असतात. मुंबई इंडियन्सच्या संघाला चिअर करणं असोत, किंवा एखाद्या नव्या व्यवसायाची नवीन उत्पादने लाँच करणे असो, त्या नेहमीच चर्चेत असतात.
पण फक्त मुकेश अंबानी यांची पत्नी अशी नीता ही यांची ओळख नाही, तर त्यांची स्वतःची देखील एक वेगळी ओळख आहे. त्या स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. मुकेश आणि नीता यांचे लग्न 1985 साली झालं. त्यांना आकाश, इशा आणि अनंत अशी तीन मुलंही आहेत. नीता या सामाजिक कार्य आणि व्यवसायासाठी नेहमीच चर्चेत असतात.
अंबानी कुटुंबाची जीवनशैली किती राजेशाही आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यांचे घर जगातील 10 सर्वात महागड्या घरांमध्ये समाविष्ट आहे. अलिकडेच नीता अंबानी यांच्या लक्झरी जीवनशैलीचा खुलासा झाला आहे.
जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असलेल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नी नीता अंबानी कोणता मोबाईल फोन वापरतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आजकाल मोबाईल फोन आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एका व्यावसायिक महिलेसाठी देखील तिचा फोन खूप महत्वाचा असतो, त्यामुळे नीता अंबानी कोणता फोन वापरता हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असेल. तर चला मग जाणून घेऊया की, नीता अंबानी कोणता फोन वापरतात.
नीता अंबानीचा वापरतात हा फोन
नीत अंबानी या जगातील सर्वात महागडा आणि आलिशान फोन वापरतात. एकीकडे त्याचे पती, हे फक्त 1500 रुपयांमध्ये स्मार्टफोन घेऊन येणार आहेत, तर दुसरीकडे खुद्द नीता अंबानी जो फोन वापरतात, त्या पैशातून मोबाईलची एक अख्खी कंपनी सुरू करता येऊ शकते.
नीता अंबानी यांच्याकडे फाल्कन सुपरनोव्हा आयफोन-6 पिंक डायमंड फोन आहे, ज्याची किंमत 48.5 दशलक्ष डॉलर्स (300 कोटी रुपयांपेक्षाही जास्त) आहे. हा फोन 2014 साली लाँच झाला होता. हा फोन 24 कॅरेट सोने आणि गुलाबी सोन्यापासून बनलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या फोनवर प्लॅटिनम कटिंग आहे ज्यामुळे हा फोन तोडता येत नाही. कोणीही हा फोन हॅक करू शकत नाही. जर कोणी तो हॅक करण्याचा प्रयत्न केला तर या फोनच्या मालकाला लगेच एक मेसेज मिळतो.
नीता अंबानी या सदैव त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत असतात; काही काळापूर्वी त्या त्यांच्या हँडबॅगमुळे चर्चेत होत्या. त्या जगातील सर्वात महागडी हँडबॅग वापरतात, ज्याची किंमत सुमारे 30 ते 40 लाखांच्या दरम्यान आहे. एवढंच नव्हे तर नीता अंबानी घरी जो हा पितात त्याची किंमतही 3 लाख रुपये आहे.