डोनाल्ड ट्रम्प दर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (डोनाल्ड ट्रम्प) यांनी बुधवारी (30 जुलै) भारतावर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली होती, जी 1 ऑगस्टपासून लागू होणार होती. परंतु ट्रम्प यांनी तूर्तास या नवीन कर लागू करण्याच्या निर्णयाला स्वल्पविराम दिला आहे. परिणामी आता भारताला एक आठवड्याचा वेळ मिळाला आहे. भारतासोबतच 70 हून अधिक देशांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की नवीन कर हा येत्या 7 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भरतासह अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. नुकताच ट्रम्प यांनी 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा टॅरिफ‘अस्त्रा’चा आदेश जारी केला आहे. त्यानुसार ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के, पाकिस्तानवर 19 टक्के, बांगलादेशवर 20 टक्के आणि अफगाणिस्तानवर 15 टक्के कर लादला होता. अशाप्रकारेअनेक देशांचा समावेश टॅरिफच्या यादीत आहे, परंतु आता नवीन कर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ट्रम्प म्हणतात की नवीन कर अमेरिकेला आर्थिक बळ देईल आणि व्यापार संतुलन देखील निर्माण करेल. या निर्णयामुळे अमेरिकेला अर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने सध्या याच कारणासाठी भारतावर शुल्क लादले आहे, जेणेकरून ते दबाव वाढवू शकतील. दोन्ही देशांमधील व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही. अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी सहाय्यक परराष्ट्र मंत्रीपद भूषवलेल्या निशा बिसवाल यांनी असेही म्हटले होते की अमेरिकेने शुल्क लादणे हे केवळ एक धोरणात्मक पाऊल आहे. ते भारतावर दबाव आणू इच्छिते?
अफगाणिस्तान -15%
अल्जेरिया – 30%
अंगोला -15%
बांगलादेश – 20%
बोलिव्हिया – 15%
बोस्निया आणि हर्जेगोविना -30%
बोस्निया आणि हर्जेगोविना – 15%
बोत्स्वाना – 15%
ब्राझील – 10%
ब्रुनेई – 25%
कंबोडिया -19%
कॅमेरून – 15%
इक्वाडोर 15%
विषुववृत्तीय गिनिया 15%
घाना – 15%
गायना 15%
आइसलँड 15%
भारत 25%
इंडोनेशिया 19%
इराक 35%
इस्त्राईल 15%
जपान 15%
जॉर्डन 15%
कझाकस्तान – 25%
लाओस 40%
लेसोथो 15%
लिबी 30%
लिक्टेनस्टाईन – 15%
मादागास्कर – 15%
मलावी 15%
मलेशिया 19%
म्यानमार 40%
नामीबियाच्या 15%
नौरू 15%
न्यूझीलंड 15%
निकारगवा 18%
नायजेरिया 15%
पाकिस्तान 19%
दक्षिण आफ्रिका – 30%
दक्षिण कोरिया – 15%
श्रीलंका – 20%
स्वित्झर्लंड – 39%
सीरिया 41%
तैवान 20%
थायलंड 19%
Trkiye 15%
व्हिएतनाम – 20%
झिम्बाब्वे – 15%
आणखी वाचा