नाशिक, सुरगाणा: माणी (ता. सुरगाणा) येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना शिजवून दिल्या जाणाऱ्या अन्नासाठी निकृष्ट भाजीपाल्याचा वापर होत असून, या संदर्भात तक्रारही करण्यात आली. मात्र, मुख्याध्यापक यांनी यावर प्रतिक्रिया देताना, ‘निकृष्ट भाजीपाला फेकण्यासाठी बाजूला ठेवलेला होता,’ असा खुलासा केला.
दरम्यान, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मागील दोन महिन्यांपासून रिक्त असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासह आहाराच्या बाबतीतही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले. आठ दिवसांच्या आत सर्व रिक्त पदे न भरल्यास बुबळी, माणी, बोरपाडा, डोल्हारे व खुंटविहीर येथील शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
माेठी बातमी! 'गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षाआश्रमशाळेत फेकण्यासाठी कुजलेले भाजीपाला त्यांना दिसला. तो भाजीपाला बाजूला वेगळा ठेवला होता. कर्मचारी कमी असल्याने तो फेकता आला नाही.
- शांताराम थविल, प्रभारी मुख्याध्यापक, माणी