16 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर गुड न्यूज, ‘या’ क्षेत्रात मोठी तेजी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Marathi August 01, 2025 09:25 PM

इंडिया बिझिनेस न्यूज: भारत ज्याची वाट पाहत होता ते साध्य होण्यास सुमारे 16 महिने लागले. ऑगस्ट महिना सुरु होताच, आर्थिक आघाडीसंदर्भात चांगली बातमी आली आहे. जागतिक अनिश्चितता असूनही, जुलै महिन्यात भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात, एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) निर्देशांक 58 च्या वर राहिला आहे. जूनमध्ये हा आकडा 58.4 होता, जो जुलैमध्ये 59.1 पर्यंत वाढला आहे. गेल्या 16 महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात तेजी

हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जूनमध्ये 58.4 वरुन जुलैमध्ये 59.1 पर्यंत वाढला. मार्च 2024 नंतर या क्षेत्रातील ही सर्वात मजबूत सुधारणा दर्शवते. 50 च्या वर पीएमआय निर्देशांक उत्पादन क्रियाकलापांमध्ये विस्तार दर्शवितो, तर 50 च्या खाली असलेला आकडा आकुंचन दर्शवितो.

एचएसबीसीच्या अहवालातील ठळक मुद्दे

एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले की, जुलैमध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ 59.1 टक्के झाली, जी जूनमध्ये 58.4 टक्के होती. नवीन ऑर्डर आणि उत्पादनात झालेल्या वाढीमुळे ही वाढ शक्य झाली.

विक्री आणि उत्पादन विक्रमी पातळीवर

सर्वेक्षणानुसार, एकूण विक्री 5 वर्षांतील सर्वात जलद गतीने वाढली. परिणामी, उत्पादन वाढ 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, भारतीय उत्पादकांना पुढील 12 महिन्यांत उत्पादन वाढण्याचा विश्वास आहे. तथापि, एकूण सकारात्मक भावना गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आली आहे.

खर्च आणि किमतींवर दबाव

सर्वेक्षणानुसार, जुलैमध्ये कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. अॅल्युमिनियम, चामडे, रबर आणि स्टीलसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्या, ज्यामुळे किमतीचा दबाव आणखी वाढला. मागणीच्या उच्च परिस्थितीमुळे कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती देखील वाढवल्या आहेत. एसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय एस अँड पी ग्लोबलने सुमारे 400 उत्पादक कंपन्यांना पाठवलेल्या प्रश्नावलींच्या उत्तरांवर आधारित संकलित केला आहे. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जूनमध्ये 58.4 वरुन जुलैमध्ये 59.1 पर्यंत वाढला आहे. मार्च 2024 नंतर या क्षेत्रातील ही सर्वात मजबूत सुधारणा  झाली आहे. तब्बल 16 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मोठ्या प्रमाणात भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळं देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे. पुढच्या काळात देखील तेडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

1 ऑगस्टपासून 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरु होणार, साडेतीन कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार, नेमकी काय आहे योजना?

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.