जुलै महिन्याचा माझी लाडकी बहिणी योजनेचे 1500 रुपये निधी आठ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. 9 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला निधी महिलांना मिळणार आहे.
यवत दंगल प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार - अजित पवारयवत प्रकरणातील दोषींवर योग्य ती आणि कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी मी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अत्यंत दक्ष आहे व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जमावबंदी लागू करण्यात आलेली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत संयमानं राहावं, असं मी सर्वांना आवाहन करतो. जातीय सलोखा टिकवून ठेवणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यवतमध्ये झालेल्या दोन गटातील हिंचासाराच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे.
सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून खूनईश्वरपूर (पूर्वीचे इस्लामपूर) शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रोहित पंडित पवार या रेकाॅर्डवरील आरोपीचा पाठलाग करत खून केला. हल्लेखोरांमध्ये आणि रोहितमध्ये आर्थिक देवाणघेवाणमधू वाद होता. रोहित यांच्या मानेवर डोक्यावर आरोपींनी शस्त्रांनी हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला
खासदारांना रोखण्यासाठी संसदेत कमांडो बोलवलेशुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून चर्चा होती. राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट सरकारकडून थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे म्हणत सरकारचा निषेध केला.