कर्नाटकात एका माजी लिपिकाच्या घरी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. छापा टाकणाऱ्या लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितलं की, माजी क्लार्कजवळ ३० कोटींची मालमत्ता सापडलीय. त्याच्याकडे २४ रहिवाशी निवासस्थानं, चार प्लॉट आणि ४० एकर शेतजमिनीची कागदपत्रं आढळून आली आहेत. त्याला नोकरीवेळी महिन्याला फक्त १५ हजार रुपये इतका पगार होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कलकप्पा निदागुंडी असं लिपिकाचं नाव आहे. तो कोप्पल शहरातील कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडमध्ये लिपिक होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की छाप्यावेळी त्याच्या घरी ३५० ग्रॅम सोनं, दीड किलो चांदी आणि चार गाड्या जप्त केल्या आहेत. यात दोन कार आणि दोन दुचाकींचा समावेश आहे.
Kangana Ranaut: एक शेतकरी नडला 'कंगना'ला भारी पडला... उच्च न्यायालयाकडून मोठा झटका! खटला रद्द करण्यास नकार; जाणून घ्या प्रकरण?कलकप्पा निदागुंडी आणि केआरआयडीएलचे माजी इंजिनिअर झेडएम चिंचोलकर यांनी ९६ अपूर्ण प्रोजेक्टसाठी बनावट कागदपत्र तयार केली. त्याच्या माध्यमातून ७२ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार केला गेला. या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार देण्यात आली होती.
लोकायुक्तांकडे तक्रारीनंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर लोकायुक्तांचे अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांवर छापा टाकत होते. २३ जुलै रोजी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी एका आयएएस अधिकाऱ्यासह ८ जणांवर छापे टाकले. यात ३७.४२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. हे छापे बंगळुरू, म्हैसूर, तुमकुरु, कलबुर्गी, कोप्पल, कोडागु जिल्ह्यात ४१ ठिकाणी टाकले. कोप्पलचे आमदार राघवेंद्र हितनाळ यांनी म्हटलं की, सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेत आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. यातील दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.