'माझ्यासाठी सिनेमा अनेक वर्ष पुढे ढकलला' पिळगांवकरांनी काढली दिग्दर्शकाची आठवण, म्हणाले,'माझ्यासोबत चित्रपट करणं त्यांची शेवटची इच्छा..'
esakal August 02, 2025 02:45 PM

सचिन पिळगांवकर यांनी गुरु दत्त यांची शेवटची इच्छा सोशल मीडियावर शेअर केली.

‘चंदा और बिजली’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली होती.

गुरु दत्त यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने हा चित्रपट पूर्ण केला.

Sachin Pilgaonkar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी लहानपणापासून प्रेक्षकांच्या मनात आपल्या कामातून छाप पाडली. दरम्यान सचिन पिळगांवकर हे काही न काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता सचिन पिळगांवरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. सचिन पिळगावकर नेहमीच संजय कुमार, अमिताभ बच्चन, मधुबाला यांचे किस्से सांगताना दिसतात. परंतु यावेळीचा किस्सा जास्त चर्चेचा ठरलाय.

सचिन पिळगांवकर यांची एक जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या पोस्टमध्ये त्यांनी दिवंगत दिग्दर्शक गुरुदत्त यांची एक आठवण शेअर केली आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले की, 'दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते गुरुदत्त यांची माझ्यासोबत चित्रपट करणं ही शेवटची इच्छा होती. परंतु त्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या भावाने ही इच्छा पुर्ण केल्याचं' सचिन पिळगांवकर म्हणालेत.

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केलाय. तसंच त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं की, 'हा फोटो चंदा आणि बिजली या सिनेमाच्या मुहूर्ताचा आहे. मी चित्रपटात चंदीची भूमिका साकारली होती. मुहुर्तावेळी सिनेमाचं नाव ठरलं नव्हतं. तेव्हा प्रॉडक्शन नंबर 12 असं लिहिण्यात आलं. खरतर दिग्दर्शक गुरुदत्त यांनी हा सिनेमा 1966 मध्येच करायचा होता. परंतु तेव्हा माझं वय नव्हतं म्हणून सिनेमा मी ११ वर्षांचा झाल्यानंतर मिळाला. परंतु त्यांची माझ्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा ही अपुर्णच राहिली. त्यानंतर त्याचे भाऊ आत्माराम यांनी ही इच्छा पूर्ण केली.' असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

FAQs

सचिन पिळगांवकर यांनी कोणाची आठवण शेअर केली आहे?

त्यांनी दिग्दर्शक गुरु दत्त यांची शेवटची इच्छा शेअर केली आहे.

कोणत्या चित्रपटाबद्दल त्यांनी पोस्ट केली आहे?

‘चंदा और बिजली’ या चित्रपटाविषयी पोस्ट केली आहे.

गुरु दत्त यांची शेवटची इच्छा काय होती?

सचिन पिळगांवकर यांच्यासोबत चित्रपट करणे ही त्यांची शेवटची इच्छा होती.

गुरु दत्त यांच्या निधनानंतर चित्रपटाची निर्मिती कोणी केली?

त्यांच्या भावाने म्हणजे आत्माराम यांनी ती पूर्ण केली.

अॅक्शन ड्रामा आणि कश्यप-शैलीचा जबरदस्त तडका, ‘निशांची' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, एक रोमांचकारी क्राईम ड्रामा अनुभवता येणार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.