Bollywood Actress Love Life: झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कोणासोबत आणि कधी जोडलं जाईल काहीही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करीना कपूर हिचा चूलत भाऊ आदर जैन आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. पण नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आदर याने अलेख आडवाणी हिच्यासोबत लग्न केलं. तर तारा हिच्या आयुष्यात देखील नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया फक्त आणि फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तारा दुसरा तिसरा कोणी नाही तर वीर पहाडिया याला डेट करत आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वीर पहाडिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. म्हणून तारा सुतारिया आता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची नातसून होणार… अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, खुद्द तारा हिने देखील रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत प्रेमाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला प्रेमावर प्रेम आहे… हा आतापर्यंत सर्वात चांगला अनुभव आहे. मला नाही वाटत की, मी जगातील दुसऱ्या कोणत्या अनुभवाची तुलना, या अनुभवासोबत करु शकते. मला असं सांगायचं आहे की, एकटं फिरणं खूप चांगलं असतं. पण आपल्या लव्हलाईफसोबत एका ट्रिपसाठी जाणं… ज्यामुळे तुमचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.’
‘प्रेमाच्या वर काहीही नाही. करीयर वैगरे प्रेमासमोर सर्वकाही फेल आहे. जो याच्या उलट बोलतो, तो जगात कुठेच राहू शकत नाही…’ असं देखील अभिनेत्री तारा सुतारिया म्हणाली आहे. सध्या सर्वत्र तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या नाात्याची चर्चा रंगली आहे.
तारा सुतारिया हिला कसा हवाय जोडीदार?मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘साध्या भाषेत सांगायचं झालं तर, मला असा जोडीदार हवा आहे, जो स्वतःला समजू शकेल… ज्याचं स्वतःवर प्रेम असेल… कोण्या दुसऱ्या व्यक्तीसाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वेळ देताय… ही गोष्ट जगातील प्रत्येत मुलीसाठी खास आहे आणि प्रत्येक मुलीला आपल्या आवडत्या व्यक्तीकडून वेळ हवा असतो…’ असं देखील तारा म्हणाली.