प्राण्यांमध्ये सर्वात प्रामाणिक प्राणी कुत्रा आहे. पण वेळेनुसार आता चित्र बदलत आहे. शहरांच्या प्रत्येत गल्लीत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. दहशतीचं दुसरं नाव म्हणजे भटके कुत्रे… असं झालं आहे. परिस्थिती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाला स्वतःहून दखल घ्यावी लागली आहे. न्यायालयाने ते अत्यंत चिंताजनक आणि भयावह म्हटले आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील होत आहे.
देशभरात कुत्र्यांच्या चाव्याच्या 37 लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. हे एक अत्यंक धक्कादायक वास्तव आहे. आता लोकं माणसाच्या सर्वात जवळच्या मित्राला, कुत्र्याला का घाबरू लागले आहेत? भटक्या कुत्र्यांची भीती आता सर्वत्र पाहायला मिळत आहे.
भटक्या कुत्र्याने चावा घेण अत्यंत चिंताजनक बाब आहे. कारण रेबीज झाल्यास वाचणं फार कठीण आहे. रेबीजचा संसर्ग नसांमध्ये पोहोचताच व्यक्तीची प्रकृती चिंताजनक होऊ शकतो. म्हणूनच ते मुलांसाठी जीवघेणं ठरत आहे. लहान मुलांच्या कमी उंचीमुळे, जेव्हा कुत्रा हल्ला करतो तेव्हा सामान्यतः मुलाच्या चेहऱ्याजवळ आणि डोक्याजवळ दुखापत होते. ज्यामुळे, संसर्ग चार ते पाच तासांत मेंदूपर्यंत पोहोचतो.
सांगायचं झालं तर, कुत्रा चावल्यानंतर घाबरण्याची काही कारण नाही. पण वेळेत उपचार होणं देखील फार गरजेचं आहे. जर तुमच्या समोर अशी दुर्दैवी घटना घडली की एखाद्याला कुत्रा चावला तर लक्षात ठेवा की जखम पूर्णपणे धुतल्यानंतर 99 टक्के संसर्ग टाळता येतो. 15 – 20 मिनिटं वाहत्या पाण्यात जखम धुणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीत विशेष काळजी घ्या…
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, कुत्रा चावल्यानंतर सुरवातीचे 8 दिवस फार महत्त्वाचे असतात. म्हणून, ज्यादिवशी कुत्र्याने चावा घेतला आहे, त्याच दिवश व्हॅक्सिनचा पहिला डोस घेणं फार गरजेचं आहे. निष्काळजी पणा केल्यास जीवावर देखील बेतू शकतं. त्यानंतर एंटीसेप्टिक किंवा डेटॉलने स्वच्छ करा… डॉक्टरांकडून अँटी-रेबीज लस (एआरव्ही) घ्या. जर कुत्र्याने खोल जखम केली असेल तर इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शन देखील द्यावे.