मोहम्मद सिराज याने पाचव्या कसोटी सामन्यात 14 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर झॅक क्रॉली याला क्लिन बोल्ड करत इंग्लंडला पहिला झटका दिला. यासह तिसर्या दिवसाचा खेळ संपला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने प्रत्युत्तरात दुसर्या डावात खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 50 धावा केल्या. क्रॉली 14 धावांवर बाद झाला. तर बेन डकेट 34 धावांवर नाबाद परतला आहे. त्यामुळे आता चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 324 धावा कराव्या लागणार आहेत. तर भारतीय संघाला मालिका बरोबरीत करण्यासाठी फक्त 8 विकेट्सचीच गरज आहे. त्यामुळे आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बेन डकेट आणि झॅक क्रॉली या सलामी जोडीने 374 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला संयमी सुरुवात करुन दिली. हे दोघे एकेरी-दुहेरी धावा जोडत राहिले. तर संधी मिळेल तेव्हा चौकार लगावले. दोघांनी अशाप्रकारे अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमधील (14) पाचव्या बॉलवर झॅकला बोल्ड करत ही जोडी फोडली. इंग्लंडला अशाप्रकारे पहिला झटका लागला. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं.