भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात डांबरी रस्त्यावर मागील महिन्यापासून झालेल्या पावसामुळे मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डांबरी रस्ता बनविण्यासाठी पालिका प्रशासन खर्च करते आणि नंतर रस्त्यात खड्डे झाल्यावर ते भरण्यासाठी देखील नागरिकांचा पैसे खर्च करते. प्रशासनाच्या अशा व्यवहाराची नागरिकांनी चौकशी करण्याची मागणी वाढू लागली आहे.
भिवंडीत दिवसेंदिवस वाढते खड्ड्याची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी चिंता व्यक्त केली असून रस्त्यातील खड्ड्यांमुळेपादचारी नागरिक, वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.वऱ्हाळा तलावाच्या काठावर एमएमआरडीए द्वारे सिमेंटचा रस्ता बांधला जात आहे. परंतु सिमेंट रस्त्याच्या कामाची गती मंदावल्याने काही ठिकाणी हे काम अपूर्ण राहिले आहे. अपूर्ण कामामुळे गायत्री बिल्डिंगजवळील रस्त्यावर मोठे, जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला सांडपाणी आणि गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे.
Mumbai Crime: टेम्पोतून प्रतिबंधित गुटख्याची विक्री, पोलिसांना कुणकुण; सापळा रचत लाखो रुपयांचा साठा जप्तशहरातील तीनबत्ती,भागात खरेदीसाठी विविध भागातून महिला-पुरुष आल्याने येथे प्रचंड गर्दी आणि वाहनांची वर्दळ असते. दुचाकीस्वार अनेकदा घसरून खड्ड्यांमध्ये पडतात. तर शहरातील नागरिकांना जुनी भिवंडीहून तीन बत्ती मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी कोटरगेट हा मुख्य मार्ग आहे. पण कोटरगेटजवळही मोठे खड्डे पडले आहेत. कोटरगेट मशिदीसमोरून पांजरापोळ येथील निजामपुराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अलिकडेच, बकरी ईद दरम्यान या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे, पाऊस पडताच डांबर वाहून गेले आणि रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत.
महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्चदरवर्षी ईद-ए-मिलादच्या वेळी या रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणावर महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याला खड्डे पडले आहेत. तसेच एसटी डेपोजवळ सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे. पण सिमेंट केलेल्या रस्त्यालगतचे पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. त्यामुळे तिथे मोठे खड्डे पडले आहेत. महानगर गॅससमोर एसटी डेपोजवळ जीवघेणे खड्डे आहेत. खड्डे भरण्याचे काम महानगरपालिकेकडून केले जात आहे. पण खड्डे भरल्यानंतर, पाऊस पडला की, रस्त्यावर पुन्हा खड्डे दिसतात. मंडईच्या आधी बॉम्बे फरसाण ते बंगालपुरा या रस्त्यावरून प्रवास करणे दुचाकीस्वारांसाठी धोक्यापेक्षा कमी नाही. खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्ता तलावात रूपांतरित झाला आहे. ज्यामध्ये अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत.
धांगे रुग्णालय ते मंडई या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गौरीपाडा-खजूरपुरा रोड, हिंदुस्थानी मशिदीजवळील मुर्गी बाजार आणि समद नगरसह इतर रस्त्यांवर विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
MSRTC: एसटी आगारांत आता पेट्रोल-डिझेल मिळणार, ‘पेट्रो-मोटेल हब’ उभारणार; महामंडळाचा मोठा निर्णयरस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी भिवंडी महापालिकेकडून दरवर्षी अंदाजे ७.५ कोटी रुपये खर्च केले जातात. परंतु कमिशनच्या अफरातफरीमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये वाया जातात. कंत्राटदाराला कमिशन दिल्याशिवाय त्यांचा चेक पास होऊ शकत नाही.
- फराज बहाद्दीन बाबा, माजी नगरसेवक
रस्ते खोदल्यामुळे शहराच्या आतून बाजारपेठेत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही.शहरातील बहुतेक रस्त्यांवर खड्डे आहेत. सिमेंट केलेले सर्व रस्ते अपूर्ण आहेत.
- प्रदीप राका, अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशन
पावसानेशहरात झालेल्या खड्ड्यात मिश्र गिट्टी टाकून खड्डे भरण्याचे काम केले जात आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या साठी अंदाजे १० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या होत्या. पावसाळ्यानंतर सर्व रस्ते डांबरीकरण केले जातील. या शिवाय नाल्यांवर बसवलेल्या चेंबर्सचे झाकण गायब झाले आहेत. झाकण बसवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्या साठी प्रत्येक विभाग समितीमध्ये अंदाजे ५० लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.
- जमील पटेल, शहर अभियंता,भिवंडी महानगरपालिका
Mumbai News: मुंबईकरांवर आजारांचे सावट! मलेरिया, डेंग्यू आणि हिपॅटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढशहरातील बहुतेक रस्ते आरसीसी केले जात आहेत. परंतु महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी ते अशा प्रकारे बनवले जातील की किमान एक वर्ष रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत.
- अनमोल सागर, महापालिका आयुक्त