प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हरने खडतर आयुष्य जगून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.
कमी वयात प्रसिद्धी मिळाल्यानंतर कामाच्या तणावामुळे ते व्यसनाधीन झाले होते.
त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत आपल्या व्यसनाधीनतेच्या आठवणी शेअर करत अनुभव मांडला.
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक टॅलेंटेड कलाकार होऊन गेले आहेत. यातीलच एक कलाकार म्हणजे जॉनी लिव्हर. अतिशय खडतर आयुष्य जगणाऱ्या जॉनीने खूप मेहनतीने बॉलिवूडमध्ये काम कमावलं. पण एकेकाळी हा अभिनेता व्यसनाधीन झाला होता. ही आठवण त्याने स्वतःच सांगितली.
जॉनी यांचं बालपण खूप हलाखीचं होतं. घरात अतिशय गरिबी होती. सपना वर्माच्या युट्युब चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. काय म्हणाले ते जाणून घेऊया.
"मी वयाच्या 17 व्या वर्षी करिअरला सुरुवात होती. मला कमी कालावधीत मला प्रसिद्धी मिळाली. सहा वर्षांच्या करिअरमध्येच माझ्या अभिनयाच्या सीडीज अमेरिकेत विकल्या जाऊ लागल्या. त्यामुळे त्याचा परिणाम पुढे माझ्या शारीरिक आणि मानसिक गोष्टीवर झाला. मी खूप थकलेली असते. त्यावेळी मी खूप थकलेलो असायचो. दिवसा सिनेमाचं शूटिंग करायचो आणि रात्री शोमध्ये परफॉर्मन्स करायचो. या व्यतिरिक्त मी खूप जास्त दारू प्यायचो. त्यामुळे अजून जास्त टाकायचो. मी बॅकस्टेजला असा बसलेलो जसं काही मी शवासन करतोय."
View this post on InstagramA post shared by Johny Lever (@iam_johnylever)
"मला कायमच परफॉर्मन्स करायला आवडायचं. त्यामुळे मी कितीही थकलेलो असलो तरीही मी काम करायचो. पण तो शो झाल्यानंतर माझ्यात अजिबात ताकद नसायची. मी लोकांना विनंती करतो कि मर्यादेत दारू प्या. मी आता स्वतःची सीमा पार केली होती. मी दारुडा झालो होतो. मी चौपाटीवर जाऊन सकाळी 4 वाजेपर्यंत दारू पीत बसायचो. कित्येकवेळा पोलीस यायचे आणि मला ओळखायचे. ते मला ओळखायचे आणि त्यांच्याच गाडीत मला बसायला द्यायचे म्हणजे मी आरामात दारू पिऊ शकेन."
आज जॉनी लिव्हर यांची संपत्ती 227 करोड रुपयांची आहे. त्यांची दोन्ही मुलं स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम करतात.
FAQs :
जॉनी लिव्हरने करिअरला सुरुवात कधी केली?
– वयाच्या 17 व्या वर्षी.
त्यांना कमी वयात प्रसिद्धी कशी मिळाली?
– त्यांच्या कॉमेडी सीडीज अमेरिकेत विकल्या गेल्या, ज्यामुळे ते लवकर लोकप्रिय झाले.
ते कोणत्या प्रकारच्या व्यसनात अडकले होते?
– ते खूप प्रमाणात दारू प्यायचे.
कामाच्या धकाधकीमुळे काय परिणाम झाला?
– ते मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकायचे व बॅकस्टेजला अर्धमेल्या अवस्थेत असायचे.
त्यांनी हे अनुभव कुठे शेअर केले?
– एका मुलाखतीत स्वतः त्यांनी हे खुलासे केले.