Actress Love Life: झगमगत्या विश्वात असे अनेक कपल आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहतात पण त्यांनी अद्याप लग्न केले नाही. लग्न करत सेलिब्रिटी कपल पती – पत्नी सारखं आयुष्य जगत आहेत. बॉलिवूमध्ये असा एक सेलिब्रिटी आहे, ज्याने पत्नीच्या निधनानंतर 18 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अभिनेत्याने सर्वांसमोर नात्याची कबुली तेव्हा तो तुफान चर्चेत आहे. आज अभिनेता त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत आनंदाने जगत आहे.
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता राहुल देव आहे. प्रोफेशनल आयुष्यात अभिनेता यशाच्या शिखरावर पोहोचला. पण राहुल याच्या खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार आले. राहुल याची पत्नी रीना देव हिचं 2009 मध्ये कर्करोगामुळे निधन झालं. तेव्हा अभिनेता पूर्णपणे खचला होता. तेव्हा 11 वर्षांच्या मुलाची पूर्ण जबाबदारी अभिनेत्यावर आली.. पण हळू – हळू दुःखातून अभिनेत्याने स्वतःला सावरलं.
18 वर्ष लहान गर्लफ्रेंडमुळे आला चर्चेत…पत्नीच्या निधनानंतर अभिनेता पूर्णपणे एकटा पडला होता. तेव्हा राहुल याच्या आयुष्यात अभिनेत्री मुग्धा गोडसे हिची एन्ट्री झाली. मुग्धा आणि राहुल यांच्या वयात तब्बल 18 वर्षांचं अंतर आहेत. पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. राहुल आणि मुग्धा यांच्या नात्याला 12 वर्ष झाली आहे.
View this post on Instagram
A post shared by MugdhaVeiraGodse (@mugdhagodse)
12 वर्ष एकत्र राहिल्यानंतर अभिनेत्रीने खास अंदाजात महत्त्वाचा दिवस साजरा केला. या खास प्रसंगी दोघांनी सोशल मीडियावर एक रोमांटिक फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसले. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ’12 वर्ष… (कोण वर्ष मोजत होतं…) राहुल देव‘ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आजही दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अद्यापही दोघांनी लग्न केलेलं नाही. ‘आम्हाला लग्नाची गरज नाही… कारण आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत…’ असं वक्तव्य राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांनी केलं होतं. आज दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.
सांगायचं झालं तर, आजही दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अद्यापही दोघांनी लग्न केलेलं नाही. ‘आम्हाला लग्नाची गरज नाही… कारण आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत…’ असं वक्तव्य राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांनी केलं होतं.