मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पार्श्वभूमीवर प्रहारची कर्जमाफीसाठी बॅनरबाजी..
मुख्यमंत्री साहेब कर्जमाफीची तारीख घोषित करा.. मोर्शीमध्ये लागले प्रहारचे बॅनर..
बॅनर लावणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री यांनी निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून असे दिले होते आश्वासन..
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करावे यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू कडून आंदोलन..
Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे एवढा पैसा कुठून येतो? - नारायण राणेउद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही शिवसेना संपवण्यासाठी बसलोय, असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.
Beed Live : बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून विनयभंगबीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात शाळकरी मुलीचे तीन आरोपींनी चारचाकी गाडीतून अपहरण करत तिचा विनयभंग केला. तसेच प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली आणि घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी नेकनूर पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
LiveUpdate: तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमकसरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेले प्रशिक्षणार्थी उतरले रस्त्यावर.
स्टेशन चौक या ठिकाणी संतप्त प्रशिक्षणार्थ्यांकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न.
आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणीला चक्कर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने
प्रशिक्षणार्थी झाले आक्रमक..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी सांगलीत तीन दिवसापासून सुरू आहे बेमुदत उपोषण.
सुकन्या गायकवाड असे प्रशिक्षणार्थी आंदोलकाचे नाव.
तीन दिवसांपासून तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे उपोषण
Solapur LiveUpdate: सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्टसर्किटमुळे आगप्रवाशांमध्ये घबराट ; एक तास स्थानाकावरील वीजपुरवठा बंद
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अचानक लागलेल्या आगीमुळे तिकीट वितरण केंद्र,एलईडी सूचना फलक,लाईट्स,पंखे,उदघोषणा प्रणाली कांही काळासाठी ठप्प ठेवण्यात आली.
अचानक अलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे कांही प्रवाशांना अडचणींचा करावा लागला सामना..
आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानाकावरील लोहमार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत 8 ते 10 अग्निरोधकांच्या माध्यमातून आग विझवली
या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झालेली नसून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील कांही महत्वाची उपकरणे जळून खाक झाली आहे.
Beed Live : सातबारा ऑनलाइन न दिसल्याने बीडमधील शेतकरी विम्यापासून वंचितबीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा योजनांपासून वंचित राहत आहेत. नुकतीच पीक विमा भरण्याची अंतिम तारीख संपली असून, ज्या शेतकऱ्यांनी २०१९ नंतर जमीन फेरफार करून नवीन सातबारा मिळवले आहेत, अशा शेतकऱ्यांचे सातबारा उतारे ऑनलाइन पोर्टलवर अद्यापही उपलब्ध नाहीत.
या तांत्रिक त्रुटींमुळे अशा शेतकऱ्यांना नुसतेच पीक विमा नव्हे, तर महाडीबीटीसारख्या इतर सरकारी योजनांचाही लाभ घेता येत नाही. अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्षच केले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सातबारा ऑनलाइन दिसत नसल्यामुळे त्यांचा शेतकरी म्हणून अधिकृत पुरावा उपलब्ध राहत नाही, आणि त्यामुळे विमा कंपन्या अर्ज स्वीकारत नाहीत.
या परिस्थितीमुळे हजारो शेतकरी आर्थिक संरक्षणाशिवाय उघडे पडले असून, शासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
Solapur Live : सोलापूर साखर घोटाळ्यावर राजकीय खळबळ; माजी आमदार राऊत यांची ईडीकडे तक्रारसोलापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी व्हावी यासाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे.
माजी आमदार राऊत म्हणाले, "मंगळवारी मी पुन्हा ईडीकडे स्मरणपत्र देणार आहे. तरीदेखील कारवाई झाली नाही तर मी हायकोर्टात धाव घेईन."
बार्शी, अक्कलकोट आणि सांगोला या तीन तालुक्यांतील साखर कारखान्यांमध्ये हा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.
साखर तारण ठेवून घेतलेले कर्ज आणि त्यासंबंधित साखर दोन्ही गायब असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
Solapur Live : महादेवी हत्तीला परत द्या, या मागणीसाठी मंगळवेढ्यात अनोखा संदेशमहादेवी हत्तीण परत करा.
या मागणीसाठी मंगळवेढ्यातील आंदोलनकर्त्यांनी पंतग उडवत संदेश दिला.
पतंगावर विविध संदेश देण्यात आले.
Sanjay Raut Live : आता उद्धव ठाकरे -राज ठाकरे एकत्र येणार : संजय राऊतफडणवीस हे अत्यंत अपयशी मुख्यमंत्री असेही राऊत म्हणाले
भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांसोबत काम करतात
यवतची दंगल दोन आमदारांनी घडवली
Latest Marathi News Updates Live : २००८ मालेगाव स्फोट प्रकरण: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळमध्ये दाखल२००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पहिल्यांदाच आपल्या भोपाळमधील निवासस्थानी दाखल झाल्या. या निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, साध्वींचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.
Jalgaon Live: सैनिकाचा मोबाइल हॅक करून आठ लाखांची फसवणूक!परस्पर कर्ज मंजूर करून सायबर गुन्हेगाराने घेतली रक्कम
चाळीसगावचे विजय चिंधा राजपूत हे भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असून, त्यांचा मोबाइल हॅक करून तब्बल आठ लाख पाच हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगाराने त्यांच्या नावे परस्पर सात लाख ४३ हजार रुपयांचे ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेतले आणि ती रक्कम वेगवेगळ्या खात्यांत वळवली. याशिवाय त्याच्या बँक खात्यातून १३ हजारांहून अधिक रक्कम डेबिट करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ही एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना आहे, जी सायबर सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधते.
Jammu and Kashmir News : कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सलग तिसऱ्या दिवशीही लष्कराची कारवाई सुरूजम्मू आणि काश्मीर : कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.
युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) च्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी रात्री २२:१८:५२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) न्यू जर्सीतील ग्रेटर न्यूयॉर्क परिसरात ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या हलक्या स्वरूपाच्या भूकंपामुळे परिसरात मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
१९ जुलै रोजी पुरीतील बालंगा येथे हल्लेखोरांनी पेटवून दिलेल्या १५ वर्षीय मुलीच्या मृत्यूबद्दल ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला आहे.
बंगळूर : मंड्याच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे, अशी माहिती बंगळूरचे पोलिस आयुक्त सीमांतकुमार सिंह यांनी शनिवारी दिली.
Karnataka News : काँग्रेस धोरणाविरोधात भाजपची मंगळवारी निदर्शनेबंगळूर : काँग्रेसच्या ‘असंवैधानिक वर्तना’विरोधात मंगळवारी (ता. ५) बंगळूरमध्ये भाजप निषेध करणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी शनिवारी जाहीर केले. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील त्याच दिवशी ‘मतदानातील गैरप्रकारां’विरोधात निषेध करणार आहेत.
Mahadevi Elephant : 'महादेवी हत्तीण' परत मिळविण्यासाठी 'स्वाभिमानी'ची आज पदयात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा‘महादेवी हत्तीण’ परत मिळविण्यासाठी रविवारी (ता.३) पहाटे पाच वाजता नांदणी येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दिवसभरात ४५ किलोमीटर चालत ही पदयात्रा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यात हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. नांदणी निशिधीका येथे श्री चक्रेश्वरी देवीची आरती झाल्यानंतर पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर निशिधीका-माणगांवेकोडीहून कोल्हापूर-सांगली महार्गावर येणार आहे.
Prajwal Revanna News : धजदचा हासनचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा, १० लाखांचा दंडLatest Marathi Live Updates 3 August 2025 : के. आर. नगरमधील घरात घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर अत्याचार आणि अपहरण प्रकरणात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने धजदचा हासनचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाख रुपयांपेक्षा जास्त दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच बिहारमधील मसुदा मतदारयाद्यांवरून राजकारण तापले असून, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नव्या यादीमध्ये स्वतःचे नावच नसल्याचा आरोप केला आहे. जम्मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. काँग्रेसमधील नेतृत्व बदलाला मोठा ‘ट्विस्ट’ आला आहे. आता सिद्धरामय्या नाहीत, डी. के. शिवकुमार नाहीत, तर जी. परमेश्वर मुख्य केंद्रबिंदू म्हणून आता उदयास आले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..