तुम्हीही येणाऱ्या काळाबद्दल चिंतेत आहात का? तुम्हालाही काहीतरी अनुचित घडणार असल्याची जाणीव होत आहे का? सध्या सर्वत्र अशा काही चर्चा सुरू आहेत, ज्या आपल्याला भविष्याबद्दल विचार करायला भाग पाडत आहेत.काही संस्थांच्या अहवालांपासून ते अंतराळ वैज्ञानिकांच्या हालचाली आणि हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यांपर्यंत, सर्व काही एकाच दिशेने संकेत देत आहेत. तसेच हे सर्व संकेत बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगाच्या 2025 शी संबंधित भविष्यवाणींशी जुळती दिसत आहे. पाकिस्तानसारख्या देशावर मोठं संकंट आलं आहे.
पाकिस्तानातील अनेक भागांत रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांनी भूकंपाच्या भीतीने संपूर्ण रात्र मोकळ्या आकाशाखाली घालवली आहे.
पाकिस्तानातील अनेक भागांत रविवारी (3 ऑगस्ट 2025) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (NSMC) नुसार, या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू रावतपासून 15 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता आणि त्याची खोली फक्त 10 किलोमीटर होती.
हे धक्के शनिवार-रविवारच्या मध्यरात्री 12:10 वाजता जाणवले, ज्यामुळे घाबरलेले लोक घराबाहेर पडले आणि सर्वजण कालिमा तय्यबा पठण करत राहिले. भूकंपाचा परिणाम खैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद, रावलपिंडी आणि आसपासच्या अनेक भागांत दिसून आला. इस्लामाबाद आणि रावलपिंडीसह मर्दान, मुर्री, हरिपूर, चकवाल, ताला गंग आणि कलर कहार येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
एका वृत्तानुसार, लोकांना आफ्टरशॉकच्या भीतीने रात्रभर मोकळ्या आकाशाखाली राहावे लागले. शनिवारीही 5.4 तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतराजीच्या भागात होता. NSMC नुसार, या भूकंपाचे धक्के पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या अनेक भागांत जाणवले.
खैबर पख्तूनख्वामध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के पेशावर, स्वात, मलकंद, नौशेरा, चारसद्दा, करक, दीर, मर्दान, मोहम्मद, शांगला, हंगू, स्वाबी, हरिपूर आणि एबटाबाद येथे जाणवले. याशिवाय इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहोर, अटॉक, टेक्सिला, मुर्री, सियालकोट, गुजरांवाला, गुजरात, शेखुपुरा, फिरोजवाला आणि मुरिदके येथेही हे धक्के जाणवले. सध्याची परिस्थिती
आतापर्यंत या दोन्ही भूकंपांमुळे कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. तरीही, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि ते संभाव्य आफ्टरशॉकपासून सावध आहेत. बाबा वेंगा यांनी संपूर्ण जगावर संकट येणार असल्याचे म्हटले होते. आता त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.