Maharashtra Politics : राज्यात शरद पवार यांना हादरा, बडा नेता काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत
Saam TV August 04, 2025 06:45 AM
  • शरद पवारांना मोठा धक्का बसणार?

  • माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवर?

  • पक्षांतराच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील माजी आमदार राहुल मोटे हे अजित पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी राहुल मोटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. जर असे घडले, तर शरद पवारांना मोठा धक्का बसेल. या चर्चा सुरु असताना आणखी एक मोठा नेता शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ७ ऑगस्ट रोजी काँग्रेसमध्ये ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांनी बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Maharashtra Politics : शरद पवार गटाला मोठा हादरा! बडा नेता अजित पवारांकडे जाण्याच्या तयारीत

मागील काही दिवसांपासून बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून बाहेर पडणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या ऐवजी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार होते असे म्हटले जात होते. काही कारणांमुळे हा निर्णय रखडला गेला. त्यानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांसह दुर्राणी यांच्या भेटी वाढल्या. यातून त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय झाल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Politics : शिवसेनेला मोठं खिंडार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

भूम, परंडा, वाशी मतदारसंघातील माजी आमदार राहुल मोटे हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. आता माजी आमदार बाबाजानी दुर्राणी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातून बाहेर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पक्षांतरामुळे शरद पवारांना धक्क्यांवर धक्के बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.