ENG vs IND: धक्कादायक! लॉर्ड्स कसोटी सुरू असताना भारतीय चाहते एस्कॉर्ट साइट करत होते स्क्रोल? Viral Video ने उडाली खळबळ
esakal August 04, 2025 09:45 AM

भारत आणि इंग्लंड संघात सध्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर झाला होता. अत्यंत रोमांचक हा सामना झाला होता, ज्यात भारताला केवळ २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, या सामन्याला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. अशात एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ENG vs IND: 'स्वीप, रिव्हर्स स्वीप मार की', जैस्वालने डकेटला डिवचलं, शुभमन गिल-साई सुदर्शननेही दिली साथ; पाहा Video

या चुरशीच्या सामन्यावेळी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर दोन भारतीय पुरुष चाहते मोबाईलवर ‘एस्कॉर्ट’ वेबसाईट स्क्रोल करताना दिसत आहेत. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात ते दोघे मोबाईलवर अश्लील सेवा शोधताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मात्र या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी सकाळ वृत्तसंस्था करत नाही. हा व्हिडिओ खरंत भारत-इंग्लंड सामन्यावेळीचा आहे का? खरंच लॉर्ड्सवरील आहे का? याबाबत कोणताही पुरावा किंवा माहिती समोर आलेली नाही. मात्र काही युझर्सने हा व्हिडिओ लॉर्ड्सवरील असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ११२.३ षटकात सर्वबाद ३८७ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रुटने १०४ धावांची खेळी केली होती, तर जेमी स्मिथने ५१ आणि ब्रायडन कार्सने ५६ धावांची खेळी केली होती. भारताकडून जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतानेही ११९.२ षटकात सर्वबाद ३८७ धावाच केल्या. भारताकडून केएल राहुलने १०० धावांची खेळी केली, तर रिषभ पंत (७४) आणि रवींद्र जडेजा (७२) यांनी अर्धशतके साकारली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ३ विकेट्स घेतल्या.

ENG vs IND, Video: गावसकरांचं मोठं मन! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या कॅप्टन गिलला दिलं खास गिफ्ट; म्हणाले, 'माझ्या धावांपेक्षा त्याच्या...'

दुसऱ्या डावात इंग्लंडने ६२.१ षटकात सर्वबाद १९२ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रुटने ४० धावा केल्या होत्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ११२ धावांवर ८ विकेट्स गमावल्या होत्या.

पण नंतर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांनी रवींद्र जडेजासोबत फलंदाजी करताना चिवट झुंज दिली. मात्र बुमराह ५४ चेंडूत ५ धावा करून बाद झाला, तर सिराज ३० चेंडूत ४ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा ६१ धावांवर नाबाद राहिला होता. भारताचा संघ ७४.५ षटकात १७० धावांवर सर्वबाद झाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.