लाहोर : पाकिस्तानचा संघ यापुढे जागतिक अजिंक्यपद लिजेंड क्रिकेट स्पर्धेत (डब्ल्यूसीएल) खेळणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने रविवारी घेतली आहे. याचसोबत डब्ल्यूसीएलच्या संयोजकांवर त्यांनी आरोप करताना म्हटले की, संयोजक पक्षपातीपणा करीत असून, क्रीडा अखंडतेचा अभावही दिसून येत आहे.
दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी डब्ल्यूसीएलमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतींमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन, इरफान पठाण, युवराज सिंग, सुरेश रैना व हरभजन सिंग या खेळाडूंनी विरोध दर्शवला. त्यामुळे साखळी फेरीतील व उपांत्य फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिका विजेतादक्षिण आफ्रिकन संघाने डब्ल्यूसीएल या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विजेतेपदावर मोहर उमटवली. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पाकिस्तान संघाचा नऊ विकेट राखून धुव्वा उडवला आणि जेतेपदाला गवसणी घातली.
Indian Wrestler: मराठमोळ्या वैष्णवीची उत्तुंग झेप; कल्याणची कन्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत लढणार पुढच्या मोसमापासून डावलण्याचे संकेतसूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले की, डब्ल्यूसीएल या स्पर्धेचे प्रमोटर यांच्याकडून पुढल्या मोसमापासून महत्त्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आगामी मोसमापासून पाकिस्तानला डावलण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे कदाचित पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.