Kavya Maran: हे काय बरोबर नाय! SRH फ्रँचायझी मालकीण काव्याने रिप्लेसमेंट म्हणून दोन पाकिस्तानी खेळाडूंना संघात करारबद्ध केले
esakal August 05, 2025 05:45 PM
  • काव्या मारनच्या मालकीच्या नॉर्दर्न सुपरचार्जर्सने मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम यांना करारबद्ध केलं.

  • भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

  • WCL मध्ये युवराजसिंगच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला आहे.

Kavya Maran’s team ropes in Mohammad Amir and Imad Wasim : इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारन हिच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव लक्षात घेता भारताने शेजाऱ्यांसोबत क्रिकेट सामनाही खेळू नये, अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. जनभावना लक्षात घेऊनच युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडियन चॅम्पियन्स संघाने WCL मध्ये पाकिस्ताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. असं सर्व घडत असताना काव्या मारनने तिच्या संघात दोन पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

काव्या मारनच्या सन ग्रुपने इंग्लंडमध्ये होणाऱ्या Hundredलीगमध्येही गुंतवणूक केली आहे आणि ही स्पर्धा आजपासून सुरू होत आहे आणि फायनल ३१ ऑगस्टला खेळवली जाणार आहे. पण, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. या लीगमध्ये ८ पैकी चार संघांमध्ये भारतीय मालकांची गुंतवणूक केली आहे. आयपीएलमधील फ्रँचायझींनी SA20 मध्येही संघ खरेदी केले आहेत आणि तिथे पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली गेली आहे. पण, दी हंड्रेडमध्ये चित्र वेगळे पाहायला मिळत आहे.

Team India's Next schedule: इंग्लंड दौरा संपला, पुढे काय? टीम इंडियाच्या पुढील सर्व स्पर्धा, मालिकांचे वेळापत्रक एका क्लिकवर

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमीर व इमाद वासीम यांना काव्या मारनची फ्रँचायझी नॉर्दर्न सुपरचार्जर्स फ्रँचायजीने करारबद्ध केले आहे. त्यामुळे वाद सुरू झाला आहे. या दोघांना बेन डॉरश्यूस व मिचेल सँटनर यांच्या जागी संघात दाखल करून घेतले आहे.

ईसीबीचे प्रमुख रिचर्ड गोल्ड यांनी आश्वासन दिले होते की, फ्रँचायझीचे मालक बदलले असले तरी त्याचा खेळाडूंच्या निवडीवर परिणाम होणार नाही. मार्चच्या ड्राफ्टमध्ये एकाही पाकिस्तानी पुरुष क्रिकेटपटूची निवड झाली नसल्याने, काहींनी भुवया उंचावल्या.

Gautam Gambhir: लहान मुलासारखा रडला गौतम गंभीर! एरवी चेहऱ्यावर काहीच भाव न दाखवणाऱ्या टीम इंडियाच्या कोचचा Viral Video द हंड्रेड २०२५ आतापर्यंतचे बदली खेळाडू
  • लंडन स्पिरिट: जेमी स्मिथ आणि ऑली पोपसाठी जॉन सिम्पसन आणि डॅन डौथवेट (५ ऑगस्ट)

  • मँचेस्टर ओरिजिनल्स: रचिन रवींद्र (६-१३ ऑगस्ट) ऐवजी मार्क चॅपमन; मार्चंट डी लँगेसाठी फरहान अहमद; एला मॅककॉघनसाठी अमरुथा सुरेनकुमार

  • नॉर्दर्न सुपरचार्जर्स: मिशेल सँटनर (७-१० ऑगस्ट) ऐवजी इमाद वसीम; बेन डॉरश्यूससाठी मोहम्मद अमीर

  • ट्रेंट रॉकेट्स: जॉर्ज लिंडे (१०-१४ ऑगस्ट) ऐवजी अकिल होसेन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.