करमाळा : पंढरपूर येथील शिवसेनेच्या बैठकीत करमाळा विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवलेले दिग्विजय बागल व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यात हमरीतुमरी झाली. तसेच एकमेकांना बघून घेण्याची भाषाही वापरण्यात आली.
MPSC Success Story: एमपीएसी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणीयावेळी करमाळ्याची माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, सतीश नीळ, कुलदीप पाटील, रंगनाथ शिंदे यांच्यासह बागल व चिवटे यांचे समर्थक उपस्थित होते. बैठकीवेळी दिग्विजय बागल यांनी आपण शिवसेना वाढीसाठी तालुकाभर काम करत असून शिवसेनेच्या शाखा उघडण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
हे सांगताच जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिग्विजय बागल यांना तुझी बहीण भाजपमध्ये... तू शिवसेनेत.. दोघेही बहीण-भाऊ एकाच गाडीत मुंबईला जाता. रश्मी बागल भाजपकडे जातात आणि तू शिवसेनेकडे जातो. तुम्ही बागलांनी तालुक्यातील दोन्हीही साखर कारखाने लुबाडुन खाल्ले, असा आरोप केला. यावरून बागल व चिवटे यांच्यात हमरीतुमरी झाली.
माेठी बातमी! 'गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षायावेळी तुझ्याकडे बघतोच, अशी भाषा बागल यांनी वापरली तर काय बघायचे ते आत्ताच बघून घे, असे म्हणत चिवटे यांनीही त्यांना आवाहन दिले. तू बाहेर ये, तू करमाळ्यात ये, तुला दाखवतो, असे बागल हे चिवटे यांना बोले. तर यावर महेश चिवटे म्हणाले, काय बघायचे ते बघ. करमाळ्यातच काय तुझ्या मांगीत येतो. तू काय करतोय तेच बघतो? असे प्रतिआव्हान दिले. यावेळी उपस्थितांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.