झगमगत्या विश्वात घटस्फोट आता सामान्य गोष्ट झाली आहे. सेलिब्रिटी आता लग्नाला 20 – 22 वर्ष झाल्यानंतर देखील घटस्फोटाचा निर्णय घेतात. सांगायचं झालं तर, सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांच्या घटस्फोटानंतर चर्चांना उधाण आलं. घटस्फोटानंतर धनुष आणि ऐश्वर्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहेत, पण मुलांसाठी ते एकत्र येतात. दरम्यान, धनुष अभिनेत्री मृणाल ठाकूरला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.
अभिनेता धनुषने नुकताच मृणाल ठाकूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती आणि आता त्या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष मृणाल ठाकूरचा हात धरून बोलताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत.. असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.
धनुष यांच्या सिनेमाच्या पार्टीत दिसली मृणाल ठाकूरयापूर्वी 3 जुलै रोजी, मृणाल ठाकूर धनुषच्या ‘तेरे इश्क में’ सिनेमाच्या पार्टीत दिसली होती, जी लेखिका आणि निर्माती कनिका ढिल्लन यांनी आयोजित केली होती. कनिकाने नंतर काही फोटो शेअर केले ज्यामध्ये ती, मृणाल ठाकूर आणि धनुष एकत्र पोज देताना दिसले. पण तेव्हा देखील दोघांनी नात्यावर वक्तव्य केलं नाही.
अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं आहे अभिनेत्रीचं नावDhanush and Mrunal Thakur are dating? pic.twitter.com/ItWYJdsm8a
— Aryan (@Pokeamole_)
मृणाल ठाकूरअविवाहित आणि सिंगल असली तरी तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं आहे. यामध्ये बादशाह, सिद्धांत चतुर्वेदी, कुशल टंडन, अर्जित तनेजा आणि शरद त्रिपाठी यांचा समावेश आहे. अभिनेत्रीने छोट्या पडद्यापासून प्रवास सुरु केला आहे ती बॉलिवूडची देखील मोठी स्टार आहे.
धनुष याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 18 वर्षांच्या लग्नानंतर, धनुष आणि ऐश्वर्या यांनी 2022 मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. यानंतर, एप्रिल 2024 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुले आहेत.
धनुष आणि मृणाल ठाकूर यांचे सिनेमेदोघांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, धनुष आता कृती सॅनन स्टारर ‘तेरे इश्क में’ सिनेमात दिसणार आहे आणि हा सिनेमा 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मृणाल ठाकूर हिचा ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सध्या तिच्या दमदार भूमिकेमुळे चर्चेत आहे.