आळेफाटा, ता. ५ : महसूल विभागामार्फत महसूल दिनानिमित्त वडगाव कांदळी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरपंच उल्का पाचपुते, मंडलाधिकारी राजेश ठुबे, ग्राम महसूल अधिकारी विद्या यादव, माजी उपसरपंच शरद पाचपुते, चेअरमन संदेश पाचपुते, नारायण पाचपुते, बार्शीनाथ पाचपुते, तुषार लांडगे, प्रकाश थोरात, शांताराम शिंदे, किरण ढोबळे, आदेश पाचपुते, आकाश लांडगे, विशाल पाचपुते, शहाबुद्दीन इनामदार उपस्थित होते.