जुनी सांगवी, ता. ३ : बालाजी प्रतिष्ठान व नगरसेवक हर्षल मच्छिंद्र ढोरे यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीमधील एकूण २७५ हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, भेट वस्तू आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी माजी महापौर उषा ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, अनुश्री ढोरे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, जवाहर ढोरे, काळुराम बारणे, युवराज ढोरे, वैभव ढोरे, उमेश बोरसे, दिलीप तनपुरे, शिवलिंग किनगे, विनोद गोहेल, आप्पा ठाकर, हिरेन सोनवणे, सुभाष ढोरे, शाम ढोरे, ओमकार भागवत, दशरथ मोरे, दत्ता यनपुरे, ज्ञानेश्वर ढोरे, सुरेश लोंढे, गणेश पवार, पुष्पा गोसावी, शीतल कांबळे, संगीता दीक्षित, सीमा पाटोळे, योजना अगेल्लू, स्मिता क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी युवा व्याख्याते वसंत हंकारे यांनी विद्यार्थी जीवन यशस्वी घडविण्यासाठी ‘न समजलेला बाप’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल गायत्री दहिवाळ, स्वरदा डुंबरे, स्नेहल देशमुख, रेश्मा चव्हाण, सतीश लोहिया यांनाही सन्मानित करण्यात आले. दिलीप तनपुरे यांनी सूत्रसंचालन केले. अनुश्री हर्षल ढोरे यांनी आभार मानले.