Solapur Umesh Patil : आमदार नसूनही गाडीवर 'आमदार' लोगो; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा 'कार'नामा
Saam TV August 05, 2025 09:45 PM
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटील यांनी आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याचा प्रकार उघड

  • हा प्रकार सोलापूर विश्रामगृहात गाडीवर दिसून आला आणि त्यानंतर वाद वाढला

  • कायद्याचा भंग झाल्यामुळे प्रशासकीय कारवाईची मागणी होत आहे

  • “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय” या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे एका वादग्रस्त प्रकारामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आमदार नसतानाही त्यांनी आपल्या खासगी वाहनावर “आमदार” असा अधिकृत लोगो लावल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सोलापूर विश्रामगृहात त्यांच्या MH04 HD 5565 क्रमांकाच्या गाडीसोबत दिसून आला आणि त्यानंतर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, राज्यातील फक्त २८८ विधानसभा सदस्य आणि ७८ विधान परिषद सदस्यांनाच शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र उमेश पाटील हे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही त्यांनी अधिकृत प्रतीक वापरल्याने नियमांच्या उल्लंघनाचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, उमेश पाटील यांना याविषयी विचारले असता त्यांनी अतिशय हलक्याफुलक्या शब्दांत, “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, म्हणून मी लोगो लावला” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आणि प्रशासनातही भुवया उंचावल्या आहेत.

Lonavala MLA Sunil Shelke : तालुक्याची बदनामी थांबवा, नाहीतर अधिवेशनात तमाशा उघड करू: आमदार शेळके यांचा इशारा

गंभीर बाब म्हणजे, अशा प्रकारे कोणताही अधिकृत हुद्दा नसताना सरकारचा लोगो किंवा प्रतीक वापरणे हा कायद्याचा भंग मानला जातो आणि यामुळे गैरप्रकार, दिशाभूल आणि शासकीय सवलतींचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते. स्थानिक पातळीवर यासंबंधी चौकशीची मागणी होत असून, याप्रकरणी पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MLAs disqualification : ऑपरेशन यशस्वी, पण रुग्णाचा मृत्यू; आमदार अपात्रतेवर आदेश देताना कोर्टाचं विधान

या घटनेने पुन्हा एकदा राजकीय पदांची नावे, प्रतीके आणि ओळखपात्र चिन्हांचा वापर कोण, कसा आणि किती अधिकृतपणे करू शकतो, या चर्चेला उधाण आले आहे. सत्तेच्या जवळ असल्याने अशा गोष्टी पचवून टाकल्या जातात का, हेही नागरिक विचारू लागले आहेत.

उमेश पाटील कोण आहेत?

उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत.

वाद का निर्माण झाला?

उमेश पाटील यांनी आमदार नसतानाही त्यांच्या गाडीवर “आमदार” लोगो लावला, जो कायद्यानुसार केवळ आमदारांनाच वापरण्याची परवानगी आहे.

कायद्यानुसार गाडीवर आमदार लोगो कोण लावू शकतो?

महाराष्ट्रातील केवळ २८८ विधानसभा आणि ७८ विधान परिषदेचे सदस्यच अधिकृतपणे गाडीवर हा लोगो लावू शकतात.

प्रशासनाची भूमिका काय आहे?

सध्या या प्रकरणी चौकशीची मागणी होत असून, नियमभंगाबाबत पोलीस व प्रशासन कोणती पावले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.