भारताने 4 ऑगस्टला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून इंग्लंड दौऱ्याची विजयी सांगता केली. इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी आघाडी दिली. भारताने दुसरा सामना जिंकत पलटवार केला आणि मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर इंग्लंडने लॉर्ड्समध्ये झालेला तिसरा सामना 22 धावांनी जिंकत मालिकेत पुन्हा आघाडी घेतली. इंग्लंड 2-1 ने पुढे निघाली. त्यामुळे भारतासाठी मालिकेत कायम राहण्यासाठी चौथा सामना हा महत्वाचा होता. भारताने चौथा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखलं. तर केनिंग्टन ओव्हलमधील सामना अवघ्या 6 धावांनी जिंकत मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. दोन्ही संघांची ही आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या चौथ्या साखळीतील पहिली मालिका होती. दोन्ही संघांनी या साखळीतील आपल्या पहिल्या मालिकेत शानदार कामगिरी करुन दाखवली. दोन्ही संघांनी या मालिकेत बॅटिंग आणि बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली.
भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही मालिका 2-2ने बरोबरीत राखली. शुबमनची कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी मालिक होती. शुबमनने अप्रतिम नेतृत्व केलं. तसेच शुबमनने द्विशतक, शतकासह या मालिकेत धावांचा पाऊस पाडला. शुबमन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने 750 पेक्षा अधिक धावा केल्या. शुबमनला त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शुबमनने कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत हा कारनामा करुन दाखवला. तसेच यशस्वी जैस्वाल यानेही 2 शतकं ठोकत आपला दबदबा कायम राखला. तसेच इतर खेळाडूंनीही भारताच्या विजयात योगदान दिलं. तसेच या मालिकेतून कसोटी पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शन याने समाधानकारक कामगिरी केली. भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यानंतर थेट आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार आशिया कप स्पर्धेत या तिघांना संधी मिळू शकते.
शुबमन आणि यशस्वी ही युवा सलामी जोडी गेल्या काही महिन्यांपासून टी 20i संघातून बाहेर आहे. आता कसोटी मालिकेनंतर हे दोघे आशिया कप स्पर्धेसाठी उपलब्ध असू शकात. बीसीसीआय सूत्रांनुसार निवड समितीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. तसेच आशिया कपसाठी भारतीय संघाची ऑगस्टमधील तिसऱ्या आठवड्यात घोषणा केली जाऊ शकते. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.