Anjali Damania: विधीमंडळांचं अधिवेशन हे जनतेचे प्रश्न थेटपणे सरकारी दरबारी मांडून ते सोडवण्याची किंवा त्याची पूर्तता करुन घेण्याचं महत्वाचं व्यासपीठ असतं. पण या व्यासपीठाचाही गैरवापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. महाराष्ट्राचं अधिवेशन हा फक्त मुद्दे उचलून खंडणी गोळा करण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा आरोप करताना त्यांनी अनेक दावेही केले आहेत.
Aditi Tatkare: "पालकमंत्रीपद म्हणजे सर्वस्वच नाही तर एक..."; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं मुद्यांवर कॉम्प्रमाईज होतंदमानिया म्हणाल्या, "महाराष्ट्राचं अधिवेशन हे फक्त मुद्दे उचलून खंडणी गोळा करण्याचा एक प्रकार आहे. बरेचसे विरोधीपक्षाचे लोक सुद्धा आणि सत्ता पक्षातले लोक सुद्धा जे मुद्दे मांडतात त्यावर मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रमाईज होतं. यामध्ये पैसे गोळा केले जातात त्यातला हा सर्वात मोठा प्रकार आहे. अधिवेशनात ज्या कंपनीविरोधात स्टिंग ऑपरेशन होतं, तीच रॅपिडो कंपनी प्रताप सरनाईकांच्या इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप देते, याला मराठी भाषेत खंडणी असं म्हटलं जातं"
BJP Politics: पोलिसांचा अजब न्याय; न्याय मागायला गेला आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा घेऊन आला! प्रताप सरनाईक टार्गेटवरएकनाथ शिंदे यांनी हे सर्व बंद करावं, एका नंतर एक त्यांच्या मंत्र्यांचे प्रताप बाहेर येत आहेत. प्रताप सरनाईकांचं प्रकरण देखील बाहेर आलेलं आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी खळबळजनक दावाही केला आहे.
Uddhav-Raj Thackeray Alliance : राज ठाकरेंसोबत युतीसाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? दिल्लीत पाऊल टाकताच उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला शिंदेंनी दिल्लीत घर घ्यावंउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना दमानिया यांनी खोचक टिप्पणी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या कोर्टाच्या वाऱ्या, अमित शहा, मोदींच्या भेटीच्या वाऱ्या या फार काळ होताना दिसत आहेत. त्यामुळं त्यांनी दिल्लीत एक चांगलं घर घ्यावं आणि तिथेच मुक्काम करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. आठवड्यातून दोनदा ते ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवबद्दल अभिनंदन करायला आठवड्यातून दोनदा जातात. मला वाटतं काहीतरी गडबड आहे. त्यांच्या जवळच्या लोकांवरती रेड होतात, काल सुद्धा एक बातमी कळली. मोठ्या उद्योजकावर जो त्यांच्या जवळच आहे त्याच्यावर देखील रेड झाली. एका मागोमाग एक मंत्र्यांवर देखील कारवाई होताना दिसते आहे, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.