तुमकुर (कर्नाटक) : राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर (Home Minister Dr. G. Parameshwar) यांच्या गावी (Tumkur Case) एक अघोरी आणि धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून कचऱ्यासारखे रस्त्यावर फेकण्यात आले.
पाच ठिकाणी आढळले मृतदेहाचे अवयवही घटना कोराटगेरे तालुक्यातील कोलाल होबळी परिसरात घडली. मुथियालम्मा मंदिराजवळ सर्वप्रथम शरीराचे काही भाग आढळले. यानंतर गरुडाचल नदीपासून ते लिंगपूर पर्यंतच्या सुमारे ३ किलोमीटर अंतरात एकूण पाच ठिकाणी रंगीबेरंगी पिशव्यांमध्ये मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत.
निजामुद्दीन परिसरात Huma Qureshi च्या भावाची निर्घृण हत्या; आसिफची पत्नी रडत-रडत म्हणाली, 'त्या लोकांनी क्रूरपणे नवऱ्याची...' पोलिसांना काय-काय सापडलं?मिळालेल्या माहितीनुसार, हात, पाय, आतडे आणि इतर अवयव हे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून टाकले गेले होते. या भीषण घटनेने कोलाल, कोराटगेरे आणि गौरीबिदानूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकच खळबळ उडवून दिली आहे.
तीन मुली असूनही समाधान नाही! मुलगा नसल्याच्या रागातून पतीने केली पत्नीची हत्या; महालक्ष्मी उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना मृत व्यक्तीची ओळख अद्याप अस्पष्टपोलीस सूत्रांनुसार, हा मृतदेह पुरुषाचा आहे की महिलेचा, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमॉर्टम आणि डीएनए तपासणीद्वारे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी तुमकुरचे पोलीस अधीक्षक अशोक यांनी भेट दिली असून सीसीटीव्ही फूटेज, स्थानिक साक्षीदारांची चौकशी आणि फॉरेन्सिक टीमचे सहकार्य घेऊन तपास सुरु करण्यात आला आहे.