Maharashtra Live News Update: अजित पवरांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले
Saam TV August 08, 2025 07:45 PM
Pune: बारामतीची तुलना चाकणशी करू नका, अजित पवारांनी कार्यकर्त्यांची काढली समजूत

पुणे -

अजित पवार-

चाकणला महानगर पालिका करायच चाललाय

बारामतीची तुलना चाकणशी करू नका

अजित पवारानी कार्यकर्त्याची समजूत काढली

उपाययोजना करण्यासाठी चाकण मध्ये महानगरपालिका आणण्याचे अजित पवार यांचे संकेत

चाकण येथे वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आज अजित पवार चाकण मध्ये आले असताना कार्यकर्तासोबत बोलत होते

Pune: अजित पवरांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले

अजित पवार पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली.

त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले.

ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये, सगळी वाहतूक सुरु करा.

Amravati: अमरावतीमध्ये दोन कामगारांचे मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन, थकलेले वेतन देण्याची मागणी

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे असलेल्या फिनले मिलमध्ये कामगारांची वेतन थकले

दोन कामगारांचे मिलमधील चिमणीवर चढून 12 तासांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू

मिलच्या प्रशासनाने बैठक घेऊन बोनस आणि वेतन देण्याचं दिलं होतं आश्वासन

मात्र बैठकीमध्ये प्रशासकीय कोणी हजर राहत नसल्याने कामगार त्रस्त

गेल्या तीन महिन्यापासून कामगारांचे वेतन थकले

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.