राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटसह मतभेद झाल्याने संजू या निर्णयापर्यंत पोहचल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. (Photo Credit : PTI)
टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन एकाएकी चर्चेत आला आहे. संजू सॅमसन आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करतो. संजू राजस्थानची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजू गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थानसाठी खेळतोय. संजूने या संघासह खेळाडू ते कर्णधार हा टप्पा गाठला आहे. मात्र संजूने राजस्थानसोबतचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. (Photo Credit : PTI)
संजूने 2013 साली राजस्थानसाठी पदार्पण केलं. संजूसह तेव्हा 10 लाख रुपयात करार करणात आला. त्यानंतर 2014 आणि 2015 साली संजूच्या वेतन रक्कमेत घसघशीत वाढ करण्यात आली. संजूला एका हंगामासाठी 4 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर राजस्थानने संजूसाठी 2018 ते 2021 दरम्यान प्रत्येक हंगामासाठी 8 कोटी रुपये मोजले. त्यानंतर 2022-2024 या कालावधीसाठी संजूला 14 कोटी रुपये देण्यात आले. तर नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या मोसमासाठी संजूला 18 कोटी रुपये मिळाले. (Photo Credit : PTI)
संजू सॅमसन आतापर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी एक दशक अर्थात 10 वर्ष खेळला आहे. संजूची या 10 वर्षांदरम्यान आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा झाली. संजूने या 10 वर्षांमध्ये राजस्थानकडून खेळताना 100 कोटी 10 लाख रुपये कमावले आहेत. (Photo Credit : PTI)
मला ट्रेडसाठी उपलब्ध ठेवावं किंवा ऑक्शनसाठी करारातून मुक्त करण्यात यावं, असं संजूने राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटला सांगितल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)