तरुणांना कमी वयात हृदयविकाराने ग्रासलेले पहायला मिळत आहे. त्याच मुख्य कारण हाय कोलेस्ट्रॉल म्हटले जात आहे. हाय कोलेस्ट्रॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण अनहेल्दी आहार आणि शारिरीक निष्क्रीयता आहे. लोक नेहमीच पिझ्झा,बर्गर, चीझ, बटर, तेलकट पदार्थ, फ्राईड पदार्थ, रिफाईंड वस्तू, प्रोसेस्ड पदार्थ जास्त प्रमाणात खात आहेत आणि एक्सरसाईज करत नाहीत. त्यांच्यात हाय कोलेस्ट्रॉलची जोखीम खूप वाढली आहे. अडचणी ही आहे की हाय कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आधी कळत नाही. तो हळूहळू हृदयाच्या धमन्यात वाढत असतो. आणि एकदिवस अचानक हार्ट अटॅक वा कार्डिएक अरेस्टचे कारण बनतो. अशात संशोधकांनी एक नामी उपाय शोधला आहे. जर रोज दोन अंडी खाल्ली तर हाय कोलेस्ट्रॉलची जोखीम खूप कमी होते. आणि अंतत: यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशन प्रकाशित झालेल्या अहवालात सांगितले आहे की आधी अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो अशी धारणा होती. परंतू ती धारणा चुकीची आहे. वास्तवात अंड्यांना जर मर्यादित प्रमाणात खाल्ले तर याने हाय कोलेस्ट्रॉल कमीच होते. संशोधकांनी अखेर स्पष्ट केले की अंडी बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवत नाहीत. अभ्यासात असे आढळले की हार्ट अटॅकसाठी हाय कॉलेस्ट्रॉलहून अधिक जबाबदार सॅच्युरेटेड फॅट जबाबदार असते. हृदय रोग जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हृदयाच्या आजाराने दरवर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्युएचओच्या मते दरवर्षी जगातील सुमारे २ कोटी लोकांचा मृत्यू होतो.भारतात जेवढे मृत्यू होतात त्यातील २५ टक्के मृत्यू हार्ट डिसीजने होतात.
जगात पहिल्यांदा साऊथ ऑस्ट्रेलिया यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांना हे संशोधन केले की डाएटमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅच वेगवेगळ्या रुपाने बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएला कसे प्रभावित करतात. जर कोणी रोज दोन अंडी खात असेल तर हार्ट डिसीजचा धोका कमीच होतो, कारण अंड्यात सॅच्युरेटेड फॅट कमी असते. मुख्य संशोधक प्रो.जॉन बकली यांनी सांगितले की अंड्यांसंदर्भातील जुन्या आणि चुकीच्या समजूतीने त्यांना बदनाम केले गेले. परंतू अंडे अनोखे आहे. यात बेशक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जादा असते. परंतू यात सॅच्युरेटेड फॅट कमी असते. सॅच्युरेटेड फॅट कमी असल्याने ते हाय कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. या संशोधनात आम्ही कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटच्या परिणामांना वेग-वेगळ्या प्रकारे पाहीले आणि अंड्यातून मिळणारा अधिक आहार कोलेस्ट्रॉल, जेव्हा कमी सॅच्युरेटेड फॅट वाल्या आहाराच्या रुपात खाल्ला गेला, तेव्हा तो बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवत नाही.