तळेगाव दाभाडे : ‘‘पुणे-लोणावळा ही दुपारी दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करावेत,’’ अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करण्याची ग्वाही वैष्णव यांनी दिली, अशी माहिती बारणे यांनी दिली. तर, विविध मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदन खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे.
रेल्वेमंत्री यांच्याकडे केलेल्या मागण्यामुंबई-पुणे मार्गावर नवीन
रेल्वे मार्गाची आवश्यकता
मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करून डीपीआर लवकर पूर्ण करावा
दुपारीची लोकल ट्रेन सुरू करून विद्यार्थ्यांसह कामगारांची होणारी गैरसोय टाळावी
पुणे-लोणावळा मार्गावर
तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती द्या
पुणे आणि मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक अधिक गतीने झाल्यास वेळेची बचत होईल.