Jalna Rain: जालना जिल्ह्यात दोन महिन्यांनंतरही पावसाची कमतरता; सात तालुक्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय कमी पर्जन्यमान
esakal August 09, 2025 12:45 AM

जालना : जिल्ह्यात मॉन्सून दाखल होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र, असमतोल पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल सात तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३५६.८० मिलिमीटर पाऊस झाला असून गतवर्षी याच काळात ४२१.७९ मिलिमीटर पाऊस पडला होता. सध्याचा पाऊस हा वार्षिक सरासरीच्या साठ टक्के आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात मॉन्सून दाखल झालेल्या सुरवातीच्या तीन दिवस जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यानंतर श्रावण महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.

मात्र, आतापर्यंत झालेला पाऊस असमतोल झाला आहे. त्यामुळे पाच तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये जालना तालुक्यात गतवर्षी ४२७.८० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ४०९.२० मिलिमीटर पाऊस झाला.

भोकरदन तालुक्यात गतवर्षी ३९०.१० , तर आतापर्यंत ३२४.३०, जाफराबाद तालुक्यात गतवर्षी ४०२.४० तर आतापर्यंत ३८५.७० मिलिमीटर, परतूरला ५०० तर आतापर्यंत ३१०.३०, मंठा तालुक्यात गतवर्षी ४७०.६० तर आतापर्यंत ३४० मिलिमीटर, अंबडला गतवर्षी ३५५.५० तर आतापर्यंत ३१६.९० मिलिमीटर आणि घनसावंगी तालुक्यात गतवर्षी ४९३.५० मिलिमीटर, यंदा आतापर्यंत ३४५.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर केवळ बदनापूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५९.१६ टक्के पाऊस झाला आहे.

Gadchiroli Accident: शोकसंतप्त नागरिकांचे महामार्गावर आंदोलन; चौघांचा मृत्यू, दोन गंभीर, भरधाव ट्रकची सहा युवकांना जबर धडक जिल्ह्यात सरासरी नऊ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गुरुवारी (ता.सात) सकाळपर्यंत मागील २४ तासात सरासरी ९.७० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये जालना तालुक्यात १४, बदनापूर तालुक्यात १४.२०, भोकरदन तालुक्यात ०.७०, जाफराबाद १.५०, परतूर तालुक्यात २.१०, मंठा तालुक्यात ५.४०, अंबड तालुक्यात ११.९०, घनसावंगी तालुक्यात २३.९० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.