आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. मागच्या पर्वात त्याला चेन्नई सुपर किंग्सने मोठी रक्कम मोजून आपल्या संघात घेतलं होतं. पण अश्विनकडून अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. इतकंच काय तर तशी संधीही मिळाली नाही. (Photo- PTI)
अश्विनने पुढील स्पर्धेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि चेन्नई सुपर किंग्स संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अश्विनने आधीच चेन्नई सुपर किंग्स बोर्डाला त्याला संघातून रिलीज विनंती केली आहे. जर आर. अश्विनला सीएसके संघातून सोडं तर आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात सहभागी होईल. (Photo- PTI)
अश्विनने चेन्नई सोडण्यामागील कारण अद्याप कळलेले नाही. पण असं सांगितलं जातं की, अश्विन लिलावात जाऊ इच्छित आहे. दहा वर्षांनी चेन्नई संघात परतलेल्या अश्विनला या फ्रँचायझीने 9.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण अश्विनने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. (Photo- PTI)
अश्विनला मागच्या पर्वात 9 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यांमध्ये अश्विनची कामगिरी दयनीय होती. अश्विनला फक्त 7 बळी घेता आले. याशिवाय, अश्विनने प्रति षटक 9.13 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. (Photo- PTI)
अश्विनने 186 चेंडू टाकले आणि 283 धावा दिल्या. अश्विन फलंदाजीतही पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने खेळलेल्या नऊ सामन्यात त्याने फक्त 33 धावा केल्या. यात फक्त 3 चौकार आणि एक षटकार होता. (Photo- PTI)
आयपीएलमध्ये अश्विनची कामगिरी अद्भुत राहिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 221 सामन्यांमध्ये 187 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनचा इकॉनॉमी रेट 7.20 आहे. अश्विन खालच्या क्रमात फलंदाजी करण्यातही चांगले योगदान देतो. त्याचा अनुभव कोणत्याही आयपीएल संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. (Photo-PTI/Surjeet Yadav/MB Media/Getty Images)