जपानच्या नागासाकी शहरामध्ये असलेल्या एका चर्चेमधील दोन्ही घंटा एकाच वेळी वाजल्या. त्यातील एक घंटा ही नवीन होती, तर दुसरी घंटा ही जुनी होती. जेव्हा या दोन्ही घंटा एकाचवेळी वाजल्या तेव्हा घड्याळामध्ये सकाळचे 11 वाजून दोन मिनिटं झाले होते. दोन्ही घंटांचा एकाच वेळी आवाज झाला आणि त्यासोबतच शहरातील असंख्य लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, शहर शातं झालं. या घंटामधून जो आवाज निघाला तो फक्त एक आवाज नव्हता तर ती एक आठवण होती, अशी आठवण ज्यामुळे आजही नागासकी शहरातील लोक दु:खी आहेत, त्यांच्या डोळ्यात आश्रू येतात. ही घटना आजपासून बरोबर 80 वर्षांपूर्वी घडली होती.
अमेरिकेचा अणुबॉम्ब हल्ला
9 ऑगस्ट 1945 च्या सकाळी 11 वाजून 2 मिनिटांनी अमेरिकेनं जपानच्या नागासाकी शहरावर अणु हल्ला केला, या हल्ल्यात सर्व काही उद्ध्वस्त झालं. या हल्ल्यामध्ये 74 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. क्षणात एक हसतं खेळतं शहर खंडर बनलं. आज जिथे हा चर्चा आहे तिथे पूर्वी चर्चची मोठी इमारत होती, ती कोसळली. सर्व काळी संपलं होतं, मात्र त्यानंतर या हल्ल्यातून जपानी नागरिकांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली.
या हल्ल्याला आज बरोबर 80 वर्ष झाले आहेत, 9 ऑगस्ट 1945 साली हा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या आठवणीमध्ये दरवर्षी या चर्चेमध्ये दोन घंटा एकाचवेळी वाजवण्याची प्रथा आहे. जेव्हा-जेव्हा या दोन घंटा एकाच वेळी वाजतात, तेव्हा तेव्हा येथील लोकांच्या या हल्ल्याच्या आठवणी ताज्या होतात, आणि संपूर्ण शहर शोक सागरात बुडून जातं, येथील लोक रडू लागतात, या घटनेला जरी 80 वर्ष झाले असले तरी देखील त्यांच्यासाठी या आठवणी आजही ताज्याच आहेत.
नागासाकी शहरावर अमेरिकेनं ज्या अणुबॉम्बने हल्ला केला होता, त्याचं नाव फॅटमॅन होतं, या हल्ल्यामध्ये 74 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, या हल्ल्याच्या बरोबर तीन दिवसांनी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा या शहरावर देखील हल्ला केला होता, या हल्ल्यामध्ये 1 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 साली जपान शरण आलं आणि दुसरं महायुद्ध संपलं.