व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं ही एक मोठी गरज झाली आहे. पण अनेकांना जिम, योगा किंवा इतर कठीण व्यायामप्रकारासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी ‘दररोज चालणे’ म्हणजेच वॉकिंग हा सर्वात सोपा, स्वस्त आणि प्रभावी व्यायाम ठरू शकतो.
वॉकिंग ही केवळ हालचाल नाही, तर शरीर आणि मन दोन्हींसाठी एक प्रकारची थेरपी आहे. नियमित चालण्यामुळे शरीराच्या विविध भागांना बळकटी मिळते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मानसिक तणाव दूर होतो.
वॉकिंग का आहे व्यायामासारखे?
1.हृदयाला बळकटी: चालताना हृदयाची गती वाढते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय निरोगी राहते.
2.वजन नियंत्रण: रोज चालल्याने कॅलरीज जळतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
3.मांसपेशी मजबूत: विशेषतः पाय, मांडी आणि कंबरेच्या स्नायूंना बळकटी मिळते.
4.तणाव कमी: सकाळी किंवा संध्याकाळी चालणे मनाला शांत करते आणि चिंता कमी करते.
5.डायबिटीज व बीपी नियंत्रण: नियमित चालल्याने साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब संतुलित राहतो.
6.पचन सुधारते: जेवणानंतरची हलकी वॉक पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या तक्रारी कमी करते.
प्रभावी वॉकिंगसाठी काही टिप्स:
1) दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा.
2) चालताना थोडासा श्वास वाढेल अशा वेगाने (Brisk Walk) चालणे फायदेशीर ठरते.
3) आठवड्यात किमान 5 दिवस वॉकिंग करा.
4) शक्यतो ताजी हवा आणि हिरवळ असलेल्या ठिकाणी चालणे अधिक आरोग्यदायी असते.
आजच्या काळात तंदुरुस्ती टिकवण्यासाठी महागड्या साधनसामग्रीची किंवा विशेष ट्रेनिंगची गरज नाही. दररोजची चाल ही केवळ व्यायाम नाही, तर दीर्घकाळ आरोग्य टिकवण्याची हमी आहे.