कल्याणची चुलबुली शिवाली परबने जबरदस्त डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
शिवाली 'पिया तू अब तो आजा...' गाण्यावर थिरकली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमुळे शिवालीला खूप प्रसिद्धी मिळाली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra ) हा कॉमेडी शो कायम प्रेक्षकांना भरपूर हसवतो. या शोमुळे अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली आहे. या शोमधून घराघरात पोहचलेली कल्याणची चुलबुली म्हणजे शिवाली परब कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती आपल्या सुंदर लूकचे फोटो आणि व्हिडीओ कायम शेअर करत राहते. तसेच ती अनेकदा डान्सचे व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ शिवाली परबने (Shivali Parab) शेअर केला आहे.
View this post on InstagramA post shared by Shivali Parab (@parabshivali)
शिवाली परब एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केला आहे. तिने शिवाली 'मोनिका ओ माय डार्लिंग' या आशा भोसले यांच्या गाण्यावर थिरकली आहे. आजही या गाण्याची तुफान क्रेझ पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये शिवाली एकटी नसून तिच्यासोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर रुपेश बने देखील आहे. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली आहे. 'पियातू अब तो आजा' हा गाणे 1971मध्ये रिलीज झालेल्या 'कारवां' या चित्रपटातील आहे. हे गाणे आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले आहे आणि आशा भोसले यांनी गायले होते.
डान्स व्हिडीओमध्ये शिवाली परब ब्लॅक सिंपल कपड्यात दिसत आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरचे कातिल हावभाव पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे. लिहिलं की,"बॉलिवूडहाऊसमध्ये आपले स्वागत आहे (भाग १)" यावरून असे डान्सचे अनेक व्हिडीओ येणार असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ घरात शूट करण्यात आला आहे.
View this post on InstagramA post shared by Shivali Parab (@parabshivali)
शिवाली परबच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. व्हिडीओवर "छान शूट... कडक परफॉर्मन्स", "मस्त", "अप्रतिम चित्रीकरण" , "कमाल", "सुंदर अभिनय" अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे. शिवाली परबची विनोदी वृत्ती प्रेक्षकांना खूप आवडते. तसेच तरुणाई तिच्या सौंदर्याची दिवाने आहेत. चाहते आता शिवाली परबच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.
Chhaava In Marathi : विकी कौशलचा 'छावा' आता मराठीत; केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार?