Thar Accident : भरधाव थारने दोघांना चिरडलं, एकाचा मृतदेह तासभर रस्त्यावरच; २६ वर्षीय तरुणाला अटक
esakal August 10, 2025 07:45 PM

दिल्लीत भरधाव थारने दोघांना चिरडल्याची घटना घडलीय. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झालीय. त्याला रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत. दुर्घटना घडली ते ठिकाण राष्ट्रपती भवनापासून दोन किमी अंतरावर आहे. नवी दिल्लीतल्या ११ मूर्तीजवळ चाणक्यपुरी इथं हा अपघात झालाय.

अपघातात पायी निघालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून जात असताना थारने त्याला धडक दिली. धडकेनंतर थार डिव्हायडरवर आदळली. थारचं पुढचं चाकही निखळलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर तासभर मृतदेह रस्त्यावर पडून होता.

पहिला पगार १० वाजता जमा, पुढच्या ५ मिनिटात राजीनामा; हे योग्य होतं का? HRची पोस्ट VIRAL

चाणक्यपुरी पोलिसांनी सांगितले की, भरधाव थारने दोघांना चिरडलं. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघात इतका भीषण होता की थारचं पुढचं चाक निखळून पडलं आहे.

अपघातानंतर थार चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. थारमध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्या असून त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

हजार कोटींची ऑफर धुडकावणाऱ्या २४ वर्षीय तरुणासोबत थेट झुकरबर्ग यांचं डील, मेटा 2196 कोटी देणार; कोण आहे मॅक डाइटके?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने मित्राची थार घेतली होती. त्याच्या डोळ्यावर झोप होती आणि त्यामुळे अपघात झाला असल्याचा दावा तरुणाने चौकशीत केला. तरुण दारू प्यायला होता की नाही? याच्या चौकशीसाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून चौकशी केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.