रोहित शर्माची मोठी खरेदी, लॅम्बोर्गिनी कारचा दुसऱ्यांदा मालक, 3015 नंबरचे खास मुलगी समायरा आणि मुलासोबत कनेक्शन
Tv9 Marathi August 10, 2025 07:45 PM

भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा याला महागड्या कारचा शोक आहे. विशेष म्हणजे त्याचे कार प्रेम सर्वांनाच माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच गाडी खराब केल्यामुळे लहान भावाचा चांगलाच क्लास लावताना रोहित शर्मा हा दिसला होता. आता नुकताच रोहित शर्मा याने लॅम्बोर्गिनी कार (Lamborghini Urus Se) खरेदी केलीये. ही कार अत्यंत आलिशान आहे. रोहित शर्मा याची कारच नाही तर त्याच्या कारचा नंबरही जोरदार चर्चेत आहे. रोहिण शर्माच्या या लॅम्बोर्गिनी कारचा नंबर 3015 आहे, त्याचे अत्यंत खास कनेक्शन देखील आहे.

रोहित शर्मा आणि रितिका या दोघांनी या कारचा नंबर खूप जास्त विचार करून चॉईस केल्याचे यावरून स्पष्ट होतंय. रोहित शर्माने केसरी रंगाची लॅम्बोर्गिनी कार खरेदी केलीये. ज्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. रोहित शर्माच्या मुलीचे नाव समायरा असून तिचा जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झालाय. कायमच रोहित शर्मा मुलगी समायरासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो. वडिलांच्या जवळपास सर्वच सामने पाहण्यासाठी समायरा स्टेडियममध्ये उपस्थित असते.

🚨NEW ORANGE LAMBORGHINI OF ROHIT SHARMA🚨

“Rohit Sharma bought a new orange colour Lamborghini Urus Se which has been delivered in Mumbai and bRO will be seen driving it soon.” pic.twitter.com/vY0aWTzGZZ

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12)

रोहित शर्मा आणि रितिका यांनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाचे स्वागत केले. रोहित शर्माचा मुलगा अत्यंत गोड आहे आणि काही दिवसांपूर्वीच रितिका ही एका सामन्यामध्ये मुलाला घेऊन पोहोचली होती. रोहित शर्माच्या मुलीच्या जन्म दिवसाची तारीख ही 30 डिसेंबर आहे तर मुलाच्या जन्म दिवसाची तारीख ही 15 नोव्हेबर आहे. दोघांच्या जन्म दिवसाची तारीख मिळून 3015  हा आकडा तयार होतो आणि रोहित शर्माच्या नव्या गाडीचा हाच नंबर आहे 3015 .

मुलीच्या आणि मुलाच्या जन्म तारखांनुसार, हा गाडी नंबर चॉईस करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लॅम्बोर्गिनी कारचे इंजिन 620 HP पॉवरचे आहे, जे 800  एनएम टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत भारतातील एक्स शोरूम 4.57 कोटी रुपये आहे. ही एसयूव्ही इलेक्ट्रिक मोडमध्ये ६० किमी पर्यंत चालवता येते. ही एक अत्यंत लग्झरी कार आहे. रोहित शर्मा याला आलिशान कारचा मोठा शोक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.