पंचांग -
रविवार : श्रावण कृष्ण १, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०२ सूर्यास्त ७.०१, चंद्रोदय सायंकाळी ७.५५, चंद्रास्त सकाळी ६.४५, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४७.
दिनविशेष -
२००० - तिसऱ्या आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताच्या नरेश कुमारने ५० किलो वजनी गटात इराणच्या यराहमादी मेहदला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.
२००६ - राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
२०१६ - तमिळनाडूतील कुडनकुलम येथे उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा प्रकल्प देशाला अर्पण.