महायुती सरकारमधील कथित भ्रष्ट मंत्र्यांविरोधात शिवसेनेने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ११ ऑगस्ट रोजी राज्यभर जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन होईल. मुंबईतील आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. हे आंदोलन शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला केलं आहे. आता या आंदोलनाबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी मत चोरीचे जे पुरावे समोर ठेवले आहेत. त्याची शहनिशा अनेक पत्रकारांनी केली. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा कोंबला आहे, हे स्पष्ट दिसत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
उद्या सर्व विरोधी खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर लाँग मार्चने जाणार आहोत. कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करतंय आणि घोटाळे बाजांना ज्या पद्धतीने सरंक्षण करतंय. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा आणि भाजपचा पुराव्यासह इतका मोठा भ्रष्टाचार बाहेर काढल्यावर आपले निवडणूक आयोग राहुल गांधींना तुम्ही प्रतिज्ञापत्रक द्या, तुम्ही शपथपत्र द्या, असे सांगत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
तोंडात बोळा कोंबलाराहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलतात. त्यांनी यावर शोध संशोधन केले आहे. ते पुराव्यासह बोलले आहेत. राहुल गांधी यांनी मत चोरीचे जे पुरावे समोर ठेवले आहेत, त्याची शहनिशा अनेक पत्रकारांनी केली. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा कोंबला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. अशा निवडणूक आयोगाविरुद्ध उद्या इंडिया आघाडीचा लाँग मार्च आहे. आम्ही ज्याला मतदान करतोय यासाठी व्हीव्हीपॅटची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आहे. पण आता निवडणूक आयोग म्हणतोय हे नसणार मग आम्हाला कसे कळणार आमचे मत कुठे गेले आहे, असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
लोकसभेला आणि विधानसभेला आम्हालाही ते लोक भेटलेनिवडणूक आयोगात इतके घोटाळे आहे. काल पवार यांनी मुद्दा मांडला, निवडणुकीपूर्वी लोक भेटले आणि १६० जागा देतो विविध रक्कम द्या. आम्हाला ही लोक भेटले आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेला आणि विधानसभेला पण हे लोक भेटले होते. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकसभेला आम्हाला यश प्राप्त झाले आहे तेव्हा पुन्हा सांगितले विधानसभेलाही मिळेल. ते म्हणालेले ६०-६५ जागा कठीण जागा सांगा, आम्ही त्या देऊ. पण त्यावेळी आमचा विश्वास निवडणूक आयोगावर विश्वास होता. पण आता राहुल गांधी यांनी पुरावे दिले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली.