-पूर्णगडमध्ये मुलांनी वृक्षाला बांधली राखी
esakal August 10, 2025 07:45 PM

-rat९p१८.jpg-
२५N८३२४९
पावस ः पूर्णगड शाळेत झाडाला राखी बांधताना विद्यार्थी आणि शिक्षक.
-----
मुलांनी वृक्षाला बांधली राखी
पूर्णगड शाळेचा उपक्रम ; झाडे जगवाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ९ ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत कार्यानुभव उपक्रमांतर्गत तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या उत्पादक उपक्रम घेण्यात आला. शाळेत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रक्षाबंधन करण्यात आले.
या शाळेमार्फत नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यावर्षीही इकोक्लब फॉर मिशन लाइफ या क्लबमार्फत एक राखी वृक्षासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षाचे पूजन करून त्याला राखी बांधण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा, त्यांचे रक्षण करा, हा संदेश रक्षाबंधन सणाच्यानिमित्ताने देण्यात आला. शाळेचा हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेच्या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.