ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करून शुभ अशुभ योगांची मांडणी केली जाते. 30 वर्षानंतर शनि ग्रह मीन राशीत विराजमान आहे. शनि महाराज अडीच वर्षे या राशीत असणार आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत दर महिन्याला शनि आणि चंद्रांची युती या राशीत होणार आहे. कारण चंद्र अडीच दिवसानंतर गोचर करतो असतो.एका राशीत पुन्हा येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. मीन राशीत चंद्र आणि शनिची युती होणार आहे. त्यामुळे विष योग तयार होणआर आहे. त्यामुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या विष योगाचा कोणत्या राशींना फटका बसणार ते…
मेष : या राशीच्या 12व्या स्थानात शनि आणि चंद्राची युती होणार आहे. हा विष योग असल्याने वायफळ खर्च वाढेल. या काळात तु्म्हाला नशिबाची हवी तशी साथ मिळणार नाही. भागीदारीच्या धंद्यात फसवणूक किंवा तोटा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी आपले शब्द जपून वापरा. कारण त्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकतो. तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. या कालावधीत तब्येतीची काळजी घ्या.
मीन : या राशीच्या लग्न स्थानात चंद्र आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे या अशुभ योगाचा फटका बसेल. आत्मविश्वासात उणीव जाणवेल. एखादं काम हाती घेतलं की ते होईल की नाही याची धाकधूक लागून राहील. या कालावधीत कोणासोबतही वाद घालू नका. कारण यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. नाही तर पैसे पुन्हा मिळणं कठीण होऊ शकतं.
सिंह : या राशीला अडीचकी सुरु आहे. शनि महाराज अष्टम स्थानात असून याच घरात युती होत आहे. त्यामुळे अशुभ योगाचा फटका बसू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना सर्वाधिक फटका बसू शकतो. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या कामात अनेक चुका घडू शकतात. त्यामुळे वरिष्ठांकडून ओरडा पडू शकतो. या कालावधीत मानसिक तणाव वाढू शकतो. तसेच एखाद्या आजाराशी झुंज द्यावी लागू शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)