डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसी प्रशासनावर टीका केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रशासकीय ठराव जाहीर करीत १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. या काळात प्राण्यांची कत्तल तसेच मांसविक्री करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांनी ही सूचना जारी केली आहे.
Dadar Kabutarkhana: दादर कबुतरखाना वाद तापला! १३ ऑगस्टला नागरिक विचारणार सरकारला जाबया निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी ‘तुमच्या बापाचे राज्य आहे का?’ असा संतप्त सवाल विचारत हा बहुजन समाजाच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला आहे. स्वातंत्र्यदिनालाच आमचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रकार असल्याचं आव्हाड म्हणाले.
तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. रस्ते आणि पुलांची अवस्था वाईट असताना प्रशासन काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचे आदेश काढणाऱ्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
डेजर्ट आणि मिठाईमध्ये काय फरक असतो? ९९ टक्के लोकांना नेमकं उत्तर माहिती नाही...या निर्णयामुळे कल्याण डोंबिवली पालिकेची चर्चा मुंबई आणि ठाणे शहरातही सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या या पालिकेवर आता या नव्या वादामुळे राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.