शिवसेनेचा मेळावा, बॅनरवरून शिंदेच गायब; पक्षाचं नाव अन् चिन्हही नाही, फक्त आमदारासह मुलाचा फोटो
esakal August 11, 2025 09:45 PM

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी चर्चेत आले होते. आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला जेवणावरून त्यांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. यानंतर संजय गायकवाड नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जोरदार चर्चा सुरूय. बुलढाण्यात चिखलीत झालेल्या शिंदे गटाच्या संवाद मेळाव्याचा बॅनर आता व्हायरल होत आहे. पक्षाचा मेळावा असूनही या बॅनरवर संजय गायकवाड आणि त्यांच्या मुलाचाच फोटो आहे. पक्षाचं नाव, चिन्ह किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो बॅनरवर नसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांचेही फोटो बॅनरवर नाहीत. शिवाय पक्षाचं चिन्हही बॅनरवर नसल्यानं आता संजय गायकवाड यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. संजय गायकवाड यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आलीय. रविवारी पहिल्यांदाच चिखली शहरात शिवसेना पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात स्टेजवर लावलेल्या बॅनरवर संजय गायकवाड आणि त्यांच्या मुलाचाच फोटो होता.

खासदारांसह प्रवाशांचा जीव टांगणीला, Air Indiaचं विमान आधी वळवलं, उतरवताना रनवेवर समोर दुसरं विमान, २ तास हवेतच

पक्षाचा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचं नाव आणि चिन्ह असायलाच हवं असा नियम आहे. पण संजय गायकवाड यांनी घेतलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बॅनरवर पिता-पुत्राचाच फोटो असल्यानं संजय गायकवाड नाराज नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संजय गायकवाड नाराज आहेत का? बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदेंचे फोटो का नव्हते? याबाबत विचारलं असता संजय गायकवाड यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या काळजातच आहेत.

Shivsena Banner Without Party Name, Only MLA & Son’s Photo

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून अद्याप म्हणाव्या तशा हालचाली सुरू नाहीत. अद्याप मुंबईच्या कार्यकारिणीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मुंबईतील शिंदे गटाचे पदाधिकारी संभ्रमात आहेत. तसंच गेल्या वर्षभरात मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठकही झालेली नाही. यामुळे शिंदेंची भूमिका काय याबाबत पदाधिकारी संभ्रमात आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.