उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये नबाव अब्दुल समद मकबऱ्यावरुन वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हिंदू संघटना सोमवारी हा मकबरा तोडण्यासाठी पोहोचल्या. हिंदू संघटनांचा दावा आहे की, हजारो वर्षापूर्वी इथे भगवान शिव आणि श्रीकृष्णाचं मंदिर होतं. प्रशासनाने मकबऱ्याच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडींग लावलेलं. पण गर्दीसमोर या सर्व उपायोजना कमी पडल्या. हा सर्व वाद शिव मंदिर आणि मकबऱ्यावरुन आहे. हिंदू संघटनांनी इथे शिव आणि श्रीकृष्ण मंदिर असल्याचा दावा केलाय. सध्या इथे हिंदू संघटनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हिंदू संघटनांचे लोक मकबऱ्यात पूजापाठ करण्यासाठी आले आहेत. प्रशासन या लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. पण गर्दी जास्त असल्याने रोखता येत नाहीय.
सदर तहसील क्षेत्रातील नवाब अब्दुल समद मकबऱ्याला भाजप जिल्हाध्यक्षाने मंदिर असल्याचं म्हटलं होतं. याच दाव्यानंतर वादाला सुरुवात झाली. मकबऱ्याच्या ठिकाणी हजार वर्षापूर्वी ठाकूर जी आणि शिवजींच मंदिर असल्याचा दावा करण्यात आलेला. मंदिराच स्वरुप बदलून मकबरा बनवण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
मजारीवर तोडफोड
मकबऱ्यात कमळाचं फुल आणि त्रिशुळाच निशाण हे मंदिराचे पुरावे असल्याच हिंदू संघटनांच म्हणणं आहे. जिल्हा प्रशासनाने हा विषय गंभीर्याने घेतला आहे. घटनास्थळी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून पोलीस आले आहेत. मकबरा परिसरात हिंदू संघटनांचे लोक घुसले आहेत. तिथे मजारीवर तोडफोड करण्यात आलीय. या दरम्यान हिंदू संघटनांची पोलिसांसोबत झडपही झाली.
मुस्लिम समुदायाचे लोक सुद्धा घटनास्थळी आले
मकबरा परिसरात बनवण्यात आलेल्या मजारीच हिंदू संघटनांनी नुकसान केलं. त्यानंतर या भागात तणाव वाढला आहे. मुस्लिम समुदायाचे लोक सुद्धा घटनास्थळी आले आहेत. डीएम आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचलेत. कायदा-सुव्यवस्था कायम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.