शहीदांना आदरांजली
esakal August 12, 2025 01:45 AM

-rat११p१९.jpg-
२५N८३६९२
रत्नागिरी : जयस्तंभ येथे स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहताना जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी, एनसीसी ऑफिसर स्नेहल पावरी व एनसीसी छात्र.
--
जांभेकर विद्यालयातर्फे
शहिदांना आदरांजली
रत्नागिरी ः क्रांतीदिनानिमित्त ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, ओरोस, सिंधुदुर्गअंतर्गत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी जयस्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यलढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी, एएनओ, ऑफिसर तथा शिक्षिका स्नेहल पावरी, पूनम नाटेकर व सुयश मोहिते आदी उपस्थित होते.

-rat११p१८.jpg-
२५N८३६९१
अनया वणजू

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत
अनया वणजूला रौप्यपदक
रत्नागिरी ः चिपळूण येथील शाहनूर तायक्वांदो अॅकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या अनया वणजू हिने ४१ किलोखालील वजनगटात रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा चिपळूण येथे झाली. अनयाने कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. तिच्या यशामुळे तिच्या पालकांबरोबर प्रशिक्षक व शाळेचाही गौरव झाला आहे.

-rat११p१४.jpg-
२५N८३६५१
रत्नागिरी : संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर यांचा सत्कार करताना संवेदना फाउंडेशनचे संस्थापक विनोद चाळके.

संपर्क युनिक फाउंडेशनचा
संवेदना फाउंडेशनतर्फे सत्कार
रत्नागिरी ः संपर्क युनिक फाउंडेशन या संस्थेचा सत्कार संवेदना फाउंडेशनतर्फे नुकताच करण्यात आला. स्वास्थ्य मित्र संस्थेचे राज्य व्यवस्थापक, संवेदना फाउंडेशनचे (मुंबई) संस्थापक अध्यक्ष विनोद चाळके यांनी संपर्क युनिक फाउंडेशनच्या जिल्हा रुग्णालयातील रुग्ण मदतकेंद्राला भेट दिली व सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी सचिव युसूफ शिरगावकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जमीर खलफे उपस्थित होते. सल्लागार सुहेल मुकादम, रुग्ण मदतकेंद्राचे प्रमुख इस्माईल नाकाडे यांची भेट घेऊन चाळके यांनी कामाची प्रशंसा केली. स्वास्थ्य मित्र संस्थेचे कार्य सध्या जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्रात सुरू आहे. या संस्थेतर्फे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन चाळके यांनी या वेळी दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.