Sanjay Shinde: महिन्यात निवडून आलेल्यांना काय कळणार आमदारकी: माजी आमदार संजय शिंदे; पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे मनभेद नव्हते
esakal August 12, 2025 03:45 AM

भोसे (क) : तीन-तीन टर्म आमदार झालेल्यांना अजून आमदारकी नीट कळाली नाही आणि एक महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी? यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचे राजकारण पुन्हा आणूया. यासाठी गणेशदादा, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, असे प्रतिपादन करमाळा विधानसभेचे माजी आमदार संजय शिंदे यांनी केले.

Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड

ते भोसे (ता. पंढरपूर) येथे स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, व्हा. चेअरमन भारत कोळेकर, व्हा. चेअरमन कैलास खुळे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सरपंच अॅड. गणेश पाटील, शिवाजीराजे कांबळे, रावसाहेब पाटील, लतीफ तांबोळी, प्रशांत देशमुख, शालिवाहन कोळेकर, शेखर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रशांत परिचारक यांनी, पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे; परंतु मनभेद नव्हते. त्यामुळे सुडाचे राजकारण कधी केले जात नव्हते. राजकारणात यश- अपयश येत राहील, अशाही परिस्थितीत टिकून राहणे महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच, सध्याच्या काळात कुणी कुणाच्याही पाया पडून तीन- साडेतीनशे कोटी आणतो आणि आमदार होतो, अशी टीका केली.

यावेळी कल्याणराव काळे यांनी, स्व. राजूबापू आज असते तर तालुक्याचे चित्र वेगळे बघायला मिळाले असते, असे सांगून, संघर्ष हा तर आपल्या पाचवीलाच पूजलेला आहे. या संघर्षाला तोंड देत आपण सारे मिळून पुढे जाऊया, असे सांगितले.

यावेळी कोमल पाटोळे यांनी ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा’ ही भैरवी गायली. यावेळी सर्व उपस्थित भावुक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती इंद्रायणी जवळ-मस्के यांनी केले तर आभार स्व. राजूबापू पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. बालाजी कोरके यांनी केले.

यांचा झाला पुरस्काराने सन्मान...

कोमल पाटोळे (कला गौरव), वासुदेव पवार (आदर्श शिक्षक), मंगल शहा (आदर्श सामाजिक संस्था) अतुल बागल (कृषी भूषण) वाल्मीक कोळी (उत्कृष्ट मृदंग वादक). पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, फेटा व रोख रक्कम असे होते.

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी भगीरथ भालके यांची अनुपस्थिती

विठ्ठल परिवारातील बहुतांश सर्व नेते भोसे येथील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र, विठ्ठल परिवारात सर्वाधिक जनादेश पाठीशी असलेले भगीरथ भालके आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीचे कारण समजू शकले नाही. मात्र, मध्यंतरी झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजित पाटील यांनी भालके यांच्यासोबत आमची चर्चा झाली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भालकेंची आजची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.