तायक्वांदो स्पर्धेत 15 सुवर्ण पदके
esakal August 12, 2025 05:45 AM

- rat११p१५.jpg-
२५N८३६५२
राजापूर ः तालुक्यातील पदकविजेत्या खेळाडूंसमवेत पदाधिकारी, मान्यवर.

तायक्वांदोत राजापूरला १५ सुवर्ण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि चिपळूण तालुका तायक्वांदो अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३वी सबज्युनिअर व ज्युनिअर ८वी कॅडेट आणि २३वी सीनियर क्युरोगी व पुमसे स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राजापूर तालुक्यातील खेळाडूंनी १५ सुवर्णपदक, ५ रौप्यपदक आणि ४ कांस्यपदकांची कमाई केली.
चिपळूण येथे झालेल्या या स्पर्धेत यज्ञेश पेणकर (सबज्युनिअर गट), रिया मयेकर (ज्युनिअर गट) आणि पूर्वा राऊत (खुला गट) हे तीन खेळाडू बेस्ट फायटरचेही मानकरी ठरले. राजापूर तालुक्यातील प्रमुख प्रशिक्षक मुकेश नाचरे, मधुरा नाचरे, अंश गुंड्ये, गौरव धालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे तायक्वांदो अॅकॅडमी राजापूरचे अध्यक्ष अभिजित तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, खजिनदार संजय मांडवकर, सदस्य दीपक धालवलकर, संदीप राऊत, प्रसाद शिवलकर, मानसी दिवटे, दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, नीलेश रहाटे आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
चिपळूण येथील स्पर्धेमध्ये विविध वयोगटातून तालुक्यातील २५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे ः श्वेत नाचरे, यज्ञेश पेणकर, युवराज पेणकर, वेदांत रहाटे, द्रोण चव्हाण, मिताली घुमे, शुभ्रा गुरव, आयुष बावकर, श्रीपाद गवंडी, रिया मयेकर, गार्गी बाकाळकर, पूर्वा राऊत, गौरव धालावलकर (सर्वांना सुवर्णपदक). नक्ष पवार, आदित्य तेली, वैष्णवी पाटील, अंश गुंड्ये (कास्यपदक) विजेते खेळाडू ः मृदुला घुमे (रौप्यपदक). नियमित पुमसे प्रकारात रिचा मांडवकर हिने वरिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले तर, गार्गी बाकळकर हिने फ्री स्टाईल पुमसे प्रकारात सुवर्णपदक तर काव्या शिवलकर हिने फ्री स्टाईल पुमसे प्रकारात कास्यपदक पटकावले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.